'हा तर रिअल लाइफ पोपॉय'; तरुणाचा फोटो सोशल मीडियावर चर्चेत

सोशल मीडियावर का होते तरुणाची कार्टूनसोबत तुलना?
'हा तर रिअल लाइफ पोपॉय'; तरुणाचा फोटो सोशल मीडियावर चर्चेत

९० च्या दशकातील अशी अनेक कार्टून्स आहेत ज्यांची लोकप्रियता अद्यापही कमी झालेली नाही. मिकी माऊस, ऑस्वल्ड, नॉडी आणि पोपॉय यांसारखी अशी असंख्य कार्टून्स आहेत ज्यांना विसरणं अनेकांना शक्य नाही. त्यातलच पोपॉय द सेलरमॅन हे कार्टून तर अनेकांचं फेव्हरेट होतं. याच कार्टूनमुळे त्याकाळी लहान मुलांनी पालक खाण्यास सुरुवात केली होती. सध्या हा पोपॉय पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. विशेष म्हणजे एका मुलाची तुलना या पोपॉयसोबत करण्यात येत आहे. त्यामुळे सध्या पोपॉय चांगलाच ट्रेंडमध्ये आला आहे. (student-dubbed-popeye-after-showing-off-his-biceps-hidden-arm-muscles-instagram-viral-video)

सध्या सोशल मीडियावर Malek Sameh या तरुणाची चर्चा रंगली आहे. या तरुणाच्या एका व्हिडीओमुळे तो सोशल मीडिया सेन्सेशन बनला आहे. विशेष म्हणजे त्याचे बायसेप्स पाहून अनेकांनी त्याची तुलना पोपॉयसोबत केली आहे.

'हा तर रिअल लाइफ पोपॉय'; तरुणाचा फोटो सोशल मीडियावर चर्चेत
Corona After Effects: ब्लॅक फंगसनंतर रुग्णांमध्ये गँगरीनची समस्या

व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये Malek त्याचे बायसेप्स दाखवत आहे. यात समोरुन पाहिल्यानंतर त्याचे बायसेप्स निमुळते असल्याचं दिसून येतं. परंतु, ज्यावेळी तो बायसेप्सची दुसरी बाजू दाखवतो त्यावेळी सगळे अचंबित होतात. त्यामुळेच हा पोपॉय आहे असं नेटकरी म्हणत आहेत.

'हा तर रिअल लाइफ पोपॉय'; तरुणाचा फोटो सोशल मीडियावर चर्चेत
गाय-वासराला पाणीपुरीची भुरळ; पाहा भन्नाट व्हिडीओ

"त्यावेळी ओव्हर साईज टीशर्ट घातल्यामुळे मी बारीक वाटत होतो. परंतु, ज्यावेळी मी टी शर्टच्या बाह्या वर केल्या आणि बायसेप्स दाखवले त्यावेळी सगळेच आश्चर्यचकित झाले आणि पाहता पाहता हा व्हिडीओ व्हायरल झाला. हा व्हिडीओ मी त्यावेळी टिकटॉकवर शेअर केला होता", असं Malek ने एका मुलाखतीत सांगितलं.

दरम्यान, Malek चे इन्स्टाग्रामवर १३ हजार फॉलोवर्स असून तो अनेकदा त्याच्या वर्कआऊटचे फोटो व व्हिडीओ शेअर करत असतो.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com