

अमेरिकेतील मिशिगन शहरातून एक संतापजनक बातमी समोर आली आहे. एका विद्यार्थिनीने आपल्या शिक्षिकेच्या डोक्यात लोखंडी खुर्ची मारल्यामुळे ही शिक्षिका जागीच बेशुद्ध पडली. या प्रकाराचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.
या व्हिडिओमध्ये दिसतंय की एका वर्गामध्ये भरपूर गोंधळ सुरू आहे, आणि शिक्षिका विद्यार्थ्यांना काहीतरी समजावून सांगण्याचा प्रयत्न करत आहे. अशातच एक विद्यार्थिनी अचानक ओरडत पुढे येते आणि शिक्षिकेकडे खुर्ची फेकते. यानंतर ही शिक्षिका तिथेच बेशुद्ध पडते.
धक्कादायक बाब म्हणजे, शिक्षिका बेशुद्ध पडल्यानंतर देखील एकही विद्यार्थी किंवा विद्यार्थिनी तिच्या मदतीसाठी पुढे येत नाही. मीडिया रिपोर्ट्समध्ये मिळालेल्या माहितीनुसार या शिक्षिकेला नंतर रुग्णालयात नेण्यात आलं, आणि तपासणीनंतर त्याच दिवशी डिस्चार्ज देण्यात आला.
हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. शिक्षकांप्रति विद्यार्थ्यांना आजिबात आदर नाही, विद्यार्थ्यांमध्ये कोणतीही शिस्त नाही - हे चित्र अगदी भीषण असल्याचं नेटिझन्स म्हणत आहेत. यामुळेच पुढे बेरोजगारी, गुन्हेगारी अशा समस्या वाढत असल्याचं मत यूजर्स व्यक्त करत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.