अच्छा है! 'फायझर'च्या दुसऱ्या डोसला विलंब झाल्यास अधिक फायदा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अच्छा है! 'फायझर'च्या दुसऱ्या डोसला विलंब झाल्यास अधिक फायदा

अच्छा है! 'फायझर'च्या दुसऱ्या डोसला विलंब झाल्यास अधिक फायदा

नवी दिल्ली : जगभरात सध्या कोरोनाच्या विषाणूने थैमान घातलं आहे. सध्या या रोगावर कसल्याही प्रकारचं प्रभावी औषध उपलब्ध झालेलं नाहीये. मात्र अनेक देशांनी वेगवेगळ्या प्रकारच्या लशींना मान्यता दिली आहे. तसेच जगभरात ठिकठिकाणी लसीकरणास प्रारंभ देखील झाला आहे. लसीकरणानंतर आणि लसीकरणादरम्यान सध्या अनेक प्रकारचे अभ्यास संशोधकांकडून केले जात आहेत. त्यातीलच एका अभ्यासाचा निष्कर्ष महत्त्वपूर्ण मानला जात आहे. फायझर कंपनीच्या (Pfizer vaccine) कोरोना लशीचा दुसरा डोस 12 आठवड्यांनंतर दिल्याने वयस्कर लोकांमधील रोगप्रतिकारक प्रक्रिया (boosts immunity) त्या लोकांच्या तुलनेत साडेतीन पटीने अधिक मजबूत होते ज्यांनी दुसरा डोस तीन आठवड्यांच्या आतच घेतला होता. ब्रिटनमध्ये झालेल्या एका अभ्यासामध्ये हा दावा केला गेलाय. (study says Delay in second shot of Pfizer vaccine boosts immunity in elderly by over 3 times)

हेही वाचा: 'डोन्ट वरी! कोरोना सर्दी-खोकल्यासारखाच होणार सामान्य'

ब्रिटनच्या सरकारने कोरोना लशीच्या दोन्ही डोसच्या दरम्यानचे अंतर कमी करुन ते आठ आठवडे केलं आहे. तर भारताने कोविशील्ड लशीचे दोन्ही डोस देण्यामधील अंतर 12 ते 16 आठवडे करण्याचे आदेश दिले आहेत. या आदेशानंतरच हा अभ्यास समोर आला आहे. वय वर्षे 80 पेक्षा जास्त वयोगटातील 175 लोकांवर केलेल्या या अभ्यासानुसार, कोणत्याही वयोगटातील रोगप्रतिकारक प्रतिक्रियेची थेट तुलना ही तीन आठवड्यांच्या अंतराने तसेच 12 आठवड्यांच्या अंतराने दुसरा फायझर लस डोस दिला गेला आहे, त्यांच्याशी केली गेली आहे.

हेही वाचा: तिसऱ्या लाटेचे संकेत! लहान मुलांच्या संख्येत चौपट वाढ

फायझरच्या लशीसाठी सर्वांत आधी अधिकृतरित्या दोन डोसच्या दरम्यानचं अंतर तीन आठवड्यांचं ठेवलं गेलं होतं. ब्रिटनसहित अनेक देशांनी ते अंतर वाढवून 12 आठवड्यांचं करण्याचा निर्णय घेतला होता जेणेकरुन मोठ्या लोकसंख्येला कमीतकमी वेळात पहिला डोस लवकरात लवकर मिळेल. मात्र ब्रिटनने गेल्या आठवड्यातच 12 आठवड्यांचा कालावधी कमी करुन आठ आठवड्यांचा केला आहे. यामागील कारण हे भारतात आढळलेल्या कोरोना व्हायरसचे नवे प्रारुप ‘बी.1.617’ चं देण्यात आलं आहे.

loading image
go to top