
Omicron : बूस्टर डोसच्या संशोधनातून मिळाला मोठा दिलासा
नवी दिल्ली : संपूर्ण जगात वेगाने पसरणाऱ्या कोरानाच्या नव्या ओमिक्रॉन व्हेरिएंटमुळे (Booster Dose for Omicron Variant) चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. अशातच फायझर लसीचा बूस्टर डोस ओमिक्रॉनच्या (Pfizer Booster Dose on Omicron) व्हेरिएंटवर 90 टक्के प्रभावी असल्याचे दिलासादयाक वृत्त समोर आले आहे. एका संशोधनात ही बाब उघड झाली आहे. शिवाय यामुळे मृत्यूदर 90 टक्क्यांनी कमी होण्यास मदत होईल, असे इस्त्रायलमध्ये केलेल्या संशोधनामध्ये समोर आले आहे. (Death Rate of Covid )
हेही वाचा: ओमिक्रॉन संसर्ग पोहचला ५८ देशांत
या अभ्यासात 50 वर्षे किंवा त्याहून अधिक वयाच्या व्यक्तींचा समावेश करण्यात आला ज्यांना किमान पाच महिन्यांपूर्वी फायझर लसीचे दोन डोस देण्यात आले होते. असे 'द न्यू इंग्लंड जर्नल ऑफ मेडिसिन' मध्ये गुरुवारी प्रकाशित झालेल्या संशोधन अहवालात नमुद करण्यात आले आहे.
असे करण्यात आले संशोधन
संशोधनात सहभागी 8,43,208 लोकांचे दोन गटांमध्ये वर्गीकरण करण्यात आले होते. या गटांपैकी एकामध्ये बूस्टर डोस मिळालेल्या नागरिकांचा समावेश करण्यात आला होता, तर दुसऱ्या गटात बूस्टर डोस न मिळालेल्या नागरिकांचा समावेश करण्यात आला होता. त्यानंतर या गटांच्या निष्कर्षांची एकमेकांशी तुलना करण्यात आली.
दरम्यान, फायझर लसीचा बूस्टर डोस कोरोना विषाणूच्या डेल्टा प्रकारातील मृत्यू 90 टक्क्यांपर्यंत कमी करू शकतो. आतापर्यंत जगभरातील कोरोना विषाणूच्या संसर्गाची संख्या 26 कोटी 93 लाख 21 हजार 866 च्या पुढे गेली आहे. तर, कोरोनामुळे आतापर्यंत 53 लाख 10 हजारांहून अधिक मृत्यू झाले आहेत.
Web Title: Study Says Pfizer Booster Dose More Effective
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..