Submarine Sank: मोठी दुर्घटना! रेड सीमध्ये पर्यटनासाठी ४४ प्रवाशांना घेऊन जाणारी पाणबुडी बुडाली, अनेकांचा मृत्यू
Submarine Sanks in Red Sea: लाल समुद्रात एक पर्यटक पाणबुडी बुडाल्याची बातमी समोर आली आहे. या पाणबुडीमध्ये ४४ प्रवासी वाहून नेण्याची क्षमता होती. यातील काहींचा मृत्यू झाला आहे.
इजिप्तच्या लाल समुद्रातील हुरघाडा शहराच्या समुद्रकिनाऱ्यावर गुरुवारी (२७ मार्च) सकाळी एक पर्यटक पाणबुडी बुडाली. या भीषण घटनेत किमान ६ जणांचा मृत्यू आणि ९ जण जखमी झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे.