महिलांनाही, साद देती हिमशिखरे!

नेपाळ, नॉर्वेच्या गिर्यारोहकांची हिमशिखरांवर यशस्वी चढाई
Kristin Harilla
Kristin HarillaSakal

काठमांडू (नेपाळ) - जगातील सर्वांत उत्तुंग एव्हरेस्टसह हिमालयातील शिखरांवर महिला गिर्यारोहकही यशस्वी चढाई करत आहेत. नेपाळमधील व्यवसायाने छायाचित्रकार असलेल्या पूर्णिमा श्रेष्ठा ही महिला गिर्यारोहक हिमालयातील आठ हजार मीटरपेक्षा अधिक उंचीची सहा शिखरे सर करणारी पहिली छायाचित्रकार बनली आहे. त्याचप्रमाणे, नॉर्वेतील क्रिस्टिन हॅरिला या महिला गिर्यारोहकाने आठ हजार मीटरपेक्षा अधिक उंच असणारी १४ शिखरे सर करण्याची मोहीम हाती घेतली आहे. विशेष म्हणजे, अवघ्या २४ दिवसांतच तिने अशी सहा शिखरे पादाक्रांत करत जवळपास निम्मी मोहीम यशस्वीरीत्या पूर्ण केली आहे.

या दोन्ही गिर्यारोहकांचे त्रिभुवन आंतरराष्ट्रीय विमानतळावर त्यांचे नातेवाईक, मित्रमंडळींनी उत्साहात स्वागत केले. महिलाही आठ हजार मीटरपेक्षा अधिक उंचीची १४ हिमशिखरे सर करू शकतात, असा विश्वास हॅरिलाने व्यक्त केला. तिने जगातील सर्वांत उत्तुंग एव्हरेस्ट पर्वतासह अन्नपूर्णा, धौलागिरी, कांचनजुंगा, मकाऊ या हिमशिखरांवरही यशस्वी चढाई केली आहे. अवघ्या २४ दिवसांत सहा उत्तुंग हिमशिखरांवर सर्वाधिक वेगवान चढाई करण्याचा विक्रम तिने केला आहे. सहा महिन्यांत १४ हिमशिखरे पादाक्रांत करण्याचा नियोजन आहे.

दरवर्षी शिखर सर करणार

श्रेष्ठा हिमशिखरे सर करतानाच एकामागून एक विक्रमांचे शिखरही सर करत आहे. गतवर्षी तिने आठव्या क्रमांकाचे शिखर धौलागिरी पादाक्रांत करणारी ती नेपाळची पहिली महिला गिर्यारोहक ठरली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com