लेझर क्षेपणास्त्राची अमेरिकेची यशस्वी चाचणी

यूएनआय
रविवार, 24 मे 2020

दृष्टिक्षेपात

  • लेझर ही थेट उर्जेवरील अस्त्रे आहेत. (डीईडब्ल्यू डायरेक्ट एनर्जी वेपन्स)- 
  • ड्रोन व सशस्त्र छोट्या बोटींविरुद्ध ते परिणामकारक बचाव शक्य 
  • अशी अस्त्रे व लेसर क्षेपणास्त्रांमुळे युद्धाच्या वेळी  प्रत्यूत्तर  व निर्णयाबाबत  सरस पर्याय उपलब्ध

हाँगकाँग - हवेत झेपावणारे व विमान नष्ट करू शकणाऱ्या लेझर क्षेपणास्त्राची अमेरिकेने १६ मे रोजी पॅसिफीक महासागरात यशस्वी चाचणी घेतली. यूएसएस पोर्टलँड या नौदलाच्या युद्धनौकेवर ही  चाचणी पार पडली. हे  जहाज वाहतुकीसाठी वापरले जाते. ते एका बंदरापाशी होते. ते  पाण्याप्रमाणेच जमिनीवरूनही जाऊ शकते.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

जगभरातील इतर बातम्यांसाठी येथे क्लिक करा 

महासागरात नेमक्या कोणत्या ठिकाणी चाचणी झाली हा तपशील मात्र देण्यात आला नाही. उच्च उर्जा असलेले घन स्वरुपातील लेझरचे अव्वल दर्जाचे क्षेपणास्त्र प्रथमच यशस्वीरित्या सोडण्यात आले. त्याद्वारे ड्रोन विमान भेदले गेले आणि त्यास आग लागल्याचे छोट्या व्हिडिओवरून दिसले. क्षेपणास्त्राची क्षमता किती होती हा तपशीलही देण्यात आला नाही, पण  २०१८ मध्ये आंतरराष्ट्रीय डावपेचात्मक अभ्यास संस्थेच्या  अहवालानुसार १५० किलोवॉटपेक्षा ती कमी नव्हती.

करुन दाखवलं! चीनमध्ये एकही नवा कोरोना रुग्ण नाही 

मानवरहित हवाई वाहने आणि छोटी विमाने यांच्याविरुद्ध  प्रगत सागरी चाचणी घेऊन आम्हाला बहुमोल माहिती मिळाली आहे. घन स्वरूपातील लेझर क्षेपणास्त्र पद्धतीचे आम्ही प्रत्यक्ष प्रयोगाद्वारे परिक्षण केले. त्यातून संभाव्य धोक्याविरुद्ध याची क्षमता आजमावता आली. याद्वारे आम्ही सागरी युद्धाची व्याख्या बदलली आहे.
- कॅप्टन केरी सँडर्स, कमांडिंग ऑफीसर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Successful US test of a laser missile