Sudan Crisis : सुदान दुष्काळाच्या विळख्यात! युद्धाची दोन वर्षे; अडीच कोटी लोकांची उपासमार
War And Hunger : गेल्या दोन वर्षांपासून सुरू असलेल्या युद्धामुळे सुदानमध्ये अडीच कोटी लोक तीव्र उपासमारीला सामोरे जात आहेत. दारफुर भागात उपासमारीने मृत्यू होण्याचे प्रकार घडत असून, देशात मानवनिर्मित आपत्ती उद्भवली आहे.
न्यूयॉर्क : गेल्या दोन वर्षांपासून सुरू असलेल्या युद्धामुळे सुदान हा देश जगातील सर्वांत मोठ्या मानवनिर्मित संकटात सापडला असून दुष्काळाचा सामना करणारा हा एकमेव आफ्रिकी देश ठरला आहे, अशी माहिती संयुक्त राष्ट्रांतील वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.