

Sudan Gold Mine Tunnel Collapse Kills 11 Miners
esakal
सुदानमध्ये सुरू असलेल्या गृहयुद्धाच्या पार्श्वभूमीवर आणखी एक भीषण दुर्घटना घडली आहे. ईशान्य सुदानमधील रेड सी स्टेटच्या दुर्गम ओनी भागातील सोन्याच्या खाणीचा बोगदा अचानक कोसळल्याने ११ खाणकामगारांचा मृत्यू झाला, तर ३० जण जखमी झाले आहेत. ढिगाऱ्याखाली आणखी काही कामगार अडकले असण्याची शक्यता असून, त्यांचा शोध घेण्यासाठी बचावकार्य सुरू आहे.