सुएझ कालव्यात नेमकं काय घडलं? जहाज बाहेर काढण्यासाठी ६ दिवस का लागले?

suez canal
suez canal

टोकियो - सुएझ कालव्यात अडकलेल्या जहाजामुळे गेल्या आठवड्याभरात जगभरात चिंता व्यक्त केली जात होती. अखेर सहा दिवसांनी एव्हर गीवन नावाचं जहाज मोकळं करण्यात यश आलं. दरम्यान, या घटनेनं सुएझ कालव्याबद्दल लोकांचे कुतुहल वाढले. या कालव्यातून केल्या जाणाऱ्या वाहतुकीची एक प्रोसेस आहे. जहाज कालव्यातून पार करण्यासाठी सुएझ प्रशासनाचे क्रू मेंबर्स असतात. असे असतानाही ही घटना कशी घडली? सुएझमध्ये सहा दिवसात जहाज काढण्यासाठी काय केलं? किती नुकसान झालं? तसंच या सर्व घटनेला जबाबदार कोण? असे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. या सगळ्याबद्दल जपानच्या टोकियोमधील के लाइन शिपिंग कंपनीत इलेक्ट्रो टेक्नो ऑफिसर असलेल्या बाळासाहेब पाटोळे यांनी सविस्तर माहिती दिलीय.

सुएझ कालव्यात जहाज अडकल्यानं जगातील व्यापारावर मोठा परिणाम झाला. सागरी वाहतूक व्यवस्था ही अत्यंत जुनी अशी आहे. जगात लाखो जहाजे आणि कोट्यवधी कर्मचारी काम करतात. शेकडो देशांमध्ये कंपन्या या व्यवसायात कार्यरत आहेत. पृथ्वीवरील समुद्र आणि भुखंडांचा विचार केल्यास जवळपास सगळे खंड अगदी विनासायास आपापसांत समुद्राने जोडले गेलेले आहेत. समुद्र मार्ग हा कांही खोदून किंवा बांधकाम करून तयार करावा लागत नाही त्यामुळे इथं असंख्य मार्ग उपलब्द्ध आहेत. जर आशियातुन अमेरिका किंवा उत्तर युरोपला जायचे असेल तर संपूर्ण आफ्रिका खंडाला वळसा घालून जायला लागणार. हा वळसा घातल्यानं लागणारा वेळ, होणारा खर्च हा प्रचंड होता त्यामुळे अशी वाहतूक परवडणारी नव्हती. तेव्हा 18 व्या शतकाच्या अखेरीस सुएझ कालव्याची 

सुएझ कालव्याचा आकार
इसवी सन पूर्व 1874 मध्ये इजिप्त चा राजा सेनाऊसरात 3 ने यावर एक मार्ग काढला. इजिप्त हे जगातील पहिले साम्राज्य आहे ज्यांनी या पृथ्वीवर पहिल्यांदा मानवनिर्मित कॅनॉल बनवला. हा कॅनॉल मेडिटेरीनियन समुद्र आणि रेड सी (लाल समुद्र) यांना जोडतो. पूर्व आणि पश्चिम जग जोडणारा एक दुवा मानला जातो. कॅनॉलच्या उत्तर भागाला पोर्ट साईड तर दक्षिण भागाला सुएझ ही ठिकाणं आहेत. बऱ्याच राजकीय घडामोडी आणि नैसर्गिक अडचणी यात हा प्रोजेक्ट शेकडो वर्षे बनवण्याच्या प्रक्रियेत अडकून होता. शेवटी इजिप्शियन अथॉरिटी आणि काही विदेशी कंपन्यांनी मिळून हा प्रोजेक्ट 17 नोव्हेंबर 1869 रोजी पूर्ण करून व्यावसायिक वाहतुकीसाठी खुला केला.

सुएझ कालव्याचा आकार?
सुएझ कॅनॉलची एकूण लांबी 193.3 किलोमीटर इतकी अफाट आहे. या 193 किलोमीटर च्या लांबीत मध्ये 3 छोटे मोठे नैसर्गिक तलाव(सरोवर) ही आहेत. त्या तलावांना गृहीत धरूनच कॅनॉल चे खोदकाम करण्यात आले आहे. जगातील एकूण समुद्री वाहतुकीच्या 10 टक्के वाहतूक ही सुएझ कॅनॉल मधून होत असते. दिवसाला सरासरी 50 ते 60 जहाजे इथून क्रॉस होतात. वाहतूक रात्रंदिवस चालू असते. कॅनॉलची रुंदी ही अशी आहे की दोन्ही दिशेने एकाच वेळी वाहतूक चालू असते. या कॅनॉल ची पाण्याची खोली गृहीत धरूनच जहाज पूर्ण क्षमतेने भरलेलं असताना यातून जाईल किंवा नाही याचं गणित आखून जहाजे बनवली जातात. यांनाच सुएझ मॅक्स जहाजे म्हटलं जातं. अगदी हाच नियम पनामा कॅनॉल ला ही लागू पडतो मात्र त्याची आकडेवारी आणि भौगोलिक परिस्थिती सुएझ कॅनॉल पेक्षा अतिशय भिन्न आहे.

सुएझ मॅक्स जहाजात खालील व्यवस्था या कायमस्वरूपी केलेल्या असतात
१. सुएझ कॅनॉल लाईट (भलामोठा 2000 वॅट चा फोकस लाईट)
२. सुएझ कॅनॉल क्रू केबिन 

सुएझ क्रॉस करताना सुएझ अथॉरिटीचे अधिकारी आणि क्रू जहाजात येतात. जहाज पूर्णतः त्यांच्या ताब्यात दिले जाते. जहाज सुएझला पोचण्याआधी 24 तास त्यांनी पाठवलेल्या चेकलिस्ट नुसारच अत्यावश्यक असणाऱ्या मशिनरी चालवून ट्रायल घेऊन सुस्थितीत असल्याचे ग्वाही पत्र कॅप्टन तिकडे पाठवतो. सुएझ कॅनॉल लाईट सुएझकडे येण्याआधीच जहाजातील कर्मचारी लावून तयार करून ट्रायल घेऊन ठेवतात. ती लाईट ऑपरेट करण्यासाठी सुएझ कॅनॉलचाच एक अतिरिक्त असा इलेक्ट्रिशियन जहाजात आलेला असतो. तसेच सोबत चार सुएझ क्रू फायबरची लहान यांत्रिक होडी घेऊनच जहाजात आपत्कालीन व्यवस्था म्हणून आलेले असतात. सर्वात महत्वाचे म्हणजे जहाज चालवण्यासाठी विशेष ट्रेनिंग घेतलेला सुएझ कॅनॉल औथोरिटीचाच पायलट ही आलेला असतो. जहाज पूर्णतः सुएझ क्रॉस होईपर्यंत टेक्निकली त्यांच्याच ताब्यात असते. जहाजाचे स्पीड आणि दिशा नियंत्रण हेसुद्धा तोच करत असतो. याच कारणांमुळे जहाज क्रॉस करवून देण्यासाठी भरमसाठ फी आकारली जाते. 

केप ऑफ गुड होपवरून जाणं खर्चिक
सुएझ कालव्यात जहाज अडकल्यानंतर सागरी वाहतूक करायची झाली तर दक्षिण आफ्रिकेच्या केप ऑफ गुड होपला वळसा घालूनच जावं लागतं. यासाठी किमान 10 ते कमाल 15 दिवस अधिक लागतात. या अधिक दिवसात जहाजाचा इंधनाचा अफाट खर्च अधिक सोसावा लागतो. तसंच जहाजातील अधिकारी आणि कर्मचारी यांचा एकूण पगार कोट्यवधींच्या आसपास जातो. तसंच या कालावधीत इतर दुसरे भाडे घेता येत नाही.

एवरगीवनच्या घटनेबद्दल
सुइज कॅनॉल क्रॉस होताना जहाज हे पूर्णतः सुएझ कॅनॉल औथोरिटी च्या स्वाधीन असते. त्यामुळे नेमकं त्यावेळी त्या जहाजातील कर्मचाऱ्यांची चुकी असण्याची शक्यता फार कमी आहे. जहाजामध्ये काही तांत्रिक त्रुटी निर्माण झाली असेल तर त्याला जहाजावरचे कर्मचारी जबाबदार असतात. कारण वेळोवेळी त्यांच्याकडून देखभाल करण्यात कमी पडल्याची शक्यता असते. तसंच कंपनीने अपेक्षित स्पेअर पार्ट किंवा बाहेरची मदतही दिली नसण्याची शक्यता असते. तसंच कोणाचीही चूक नसताना एखादं यंत्र बंद पडू शकतं. त्यावेळी काहीच पर्याय उरत नाही. आता या घटनेची चौकशी होईल. झालेल्या नुकसानीबद्दल कोणालातरी जबाबदार ठरवायचे म्हणून जहाजाच्या क्रू मेंबर्सना बळीचा बकराही बनवलं जाण्याची शक्यता नाकारता येत नाही असंही म्हटलं जात आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com