सुएझ कालव्यात जहाज अडकल्याचे खापर भारतीय क्रू मेंबर्सवर; कारवाईची शक्यता

suez canal.
suez canal.

कैरो- सुएझ कालव्यामध्ये सहा दिवसांपासून अडकलेले एवर गिवेन जहाज एकदाचे बाहेर काढण्यात आले. त्यामुळे पुन्हा एकदा या कालव्यातून मालवाहतुकीला सुरुवात होऊ शकणार आहे. एवर गिवेन हे महाकाय मालवाहतूक जहाज जेव्हा सुएझ कालव्यावर अडकले, त्यावेळी त्याचे संचालन भारतीय क्रू कर्मचारी करत होते. जहाजावरील सर्वच्या सर्व म्हणजे 25 कर्मचारी भारतीय होते. यातील तिघे मुंबईतले कर्मचारी आहेत. टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या रिपोर्टनुसार सुएझ कालव्यात जहाज अडकल्याप्रकरणी क्रू कर्मचाऱ्यांवर कारवाई केली जाणार आहे. त्यामुळे भारतीय सरकारसह जलवाहतूक संघटनांनी याबाबत चिंता व्यक्त केली आहे. सर्व भारतीय क्रू कर्मचाऱ्यांविरोधात गुन्ह्याचा खटला दाखल होण्याची शक्यता आहे.  रिपोर्टमध्ये सांगण्यात आलंय की, चौकशी पूर्ण होईपर्यंत कर्मचाऱ्यांना हाऊस अरेस्टमध्ये ठेवले जाणार आहे. असे असले तरी जहाज व्यवस्थापनाने क्रू कर्मचाऱ्यांना कोणत्या कायदेशीर प्रक्रियेतून जावं लागेल हे सांगितलेलं नाही. 

शिपिंग इंडस्ट्रीशी संबंधित एका अधिकाऱ्याने सांगितल्यानुसार, भारतीय कर्मचाऱ्यांना बळीचा बकरा बनवले जाण्याची भीती आहे. नॅशनल शिपिंग बोर्डचे National Shipping Board (NSB) सदस्य कॅप्टन संजय प्रशार यांनी TOI शी बोलताना सांगितलं की, 'अवाढव्य जहाज कशामुळे भरकटलं याबाबत सखोल तपाल केला जाईल. यासाठी क्रू कर्मचाऱ्यांमध्ये झालेले संभाषण तपासले जाईल. यासंबंधीचा डेटा जमा करण्यात आला असून जहाज अडकल्यामागील कारणाचा शोध घेतला जात आहे.'

मालवाहतूक जहाज सुएझ कालव्यामध्ये 6 दिवस अडकले होते. त्यानंतर समुद्रातील भरतीमुळे जहाजाला बाहेर काढण्यास यश आल्याचे सांगितले जाते. जहाजाला बाहेर काढण्यासाठी अनेक टगबोटीही कामाला लागल्या होत्या. सुरुवातील 8 शक्तीशाली टगबोटी जहाजाला बाहेर काढत होत्या, त्यानंतर आणखी 6 टगबोटींची मदत घेण्यात आली. अवाढव्य जहाज एकदाचे बाहेर निघाल्याने जगाने सुटकेचा निश्वास सोडला आहे. जागतिक व्यापारापैकी जवळपास 12 टक्के व्यापार या कालव्यातून होतो. कालवा ब्लॉक झाल्याने जिवनावश्यक वस्तूंसह कच्चा तेलाची वाहतूक थांबली होती. त्यामुळे अब्जावधी रुपयांचे नुकसान होत होते. 

जहाज कालव्यामध्ये कशामुळे अडकले याचा शोध घेतला जातोय. सुरुवातीच्या रिपोर्टनुसार, जोराच्या वाऱ्यामुळे निर्माण झालेल्या वादळांनी दृष्यता कमी झाली. त्यामुळे जहाज किनाऱ्यावर जाऊन रुतुन बसले. पण, इजिप्शियन अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार मानवी चुकीमुळेही जहाज भरकटू शकते. काहीही असले तरी, कालवा ब्लॉक झाल्यामुळे युरोप आणि आशियामधील व्यापारामध्ये मोठा अडथळा निर्माण झाला. अखेर जहाज बाहेर काढण्यात आल्याने दिलासा मिळाला आहे. पण, वाहतूक सुरळीत होण्यासाठी आणखी काही दिवस लागण्याची शक्यता आहे. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com