अफगाणिस्तानची राजधानी काबुलमध्ये मंत्रालयात बुधवारी एक मोठा आत्मघाती हल्ला झाला. ज्यामध्ये तालिबान सरकारचे निर्वासित मंत्री खलील उर-रहमान हक्कानी आणि इतर चार लोक ठार झाले . तीन वर्षांपूर्वी काबूलची सत्ता काबीज करणाऱ्या तालिबानला हा मोठा धक्का आहे. कारण पहिल्यांदाच सरकारमधील एका मोठ्या नेत्याला लक्ष्य करण्यात आले आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे खलील हक्कानी हे तालिबान सरकारचे गृहमंत्री सिराजुद्दीन हक्कानी यांचे काका होते. सिराजुद्दीन हे तालिबानचा कणा असल्याचे सांगितले जाते.