esakal | सुमनकुमारी पाकिस्तानातील पहिल्या हिंदू महिला न्यायाधीश
sakal

बोलून बातमी शोधा

सुमनकुमारी पाकिस्तानातील पहिल्या हिंदू महिला न्यायाधीश

सुमनकुमारी पाकिस्तानातील पहिल्या हिंदू महिला न्यायाधीश

sakal_logo
By
पीटीआय

इस्लामाबाद, : पाकिस्तानमध्ये प्रथमच एका हिंदू महिलेची दिवाणी न्यायाधीश म्हणून नियुक्ती झाली आहे. पाकिस्तानात हिंदूंची संख्या केवळ 2 टक्के असताना हिंदू महिलेची निवड होणे ही गौरवाची बाब मानली जात आहे. सुमनकुमारी असे त्यांचे नाव असून, गरिबांना मोफत कायदेशीर सल्ला आणि मदत करण्याचा त्यांनी निर्धार केला आहे. 

भारताच्या गानसम्राज्ञी लता मंगेशकर आणि गायक अतिफ अस्लम यांच्या जबरदस्त फॅन असलेल्या सुमनकुमारी या पाकिस्तानच्या सिंध प्रांतातील कांबर-शहदादकोटच्या रहिवासी होत. त्या आपल्याच जिल्ह्यात दिवाणी न्यायाधीश म्हणून सेवा देणार आहेत. पाकिस्तानातील हैदराबादेतून त्यांनी कायद्याची पदवी घेतली आणि कराचीच्या सजबिस्त विद्यापीठातून कायद्यात उच्च शिक्षण घेतले. सुमन यांचे वडील पवनकुमार हे नेत्रविकारतज्ज्ञ आहेत, तर त्यांची मोठी बहीण सॉफ्टवेअर इंजिनिअर, तर आणखी एक बहीण चार्टर्ड अकाउंटट आहे.

सुमनकुमारी यांची निवड झाल्याबद्दल अत्यानंदित झालेले वडील म्हणाले, सुमनकुमारीने आव्हानात्मक करिअरची निवड केली. मात्र, ती जिद्दीने आणि मेहनतीने हे आव्हान सहजपणे पेलेल आणि आपले ध्येय प्राप्त करेल, असा विश्‍वास आहे. सुमनकुमारी या पाकिस्तानच्या पहिल्या हिंदू महिला दिवाणी न्यायाधीश असताना न्यायाधीश राणा भगवानदास हे पाकिस्तानचे पहिले हिंदू न्यायाधीश राहिलेले आहेत. ते 2005 ते 2007 या दरम्यान न्यायाधीश होते. 

loading image