मास्कच्या वापरास पाठिंबा द्या : बायडेन

पीटीआय
Wednesday, 7 October 2020

कोरोनाच्या जागतिक साथीविरुद्ध परिणामकारक लढा देता यावा म्हणून अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मास्क वापरण्याच्या देशव्यापी आदेशाला पाठिंबा द्यावा, असे आवाहन डेमोक्रॅटिक पक्षाचे प्रतिस्पर्धी उमेदवार ज्यो बायडेन यांनी केले.

वॉशिंग्टन - कोरोनाच्या जागतिक साथीविरुद्ध परिणामकारक लढा देता यावा म्हणून अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मास्क वापरण्याच्या देशव्यापी आदेशाला पाठिंबा द्यावा, असे आवाहन डेमोक्रॅटिक पक्षाचे प्रतिस्पर्धी उमेदवार ज्यो बायडेन यांनी केले.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

निवडणुकीच्या पहिल्या वादविवाद सत्रात कोरोनाच्या हाताळणीवरून बायडेन यांनी ट्रम्प यांच्यावर टीका केली होती. त्यानंतर ट्रम्प यांच्यावर रुग्णालयात दाखल होण्याची वेळ आली. या पार्श्वभूमीवर बायडेन यांनी आपला मुद्दा आग्रहाने मांडला. ते म्हणाले, की प्रत्येक सरकारी कार्यालय तसेच सुविधा केंद्रात मास्क वापरणे बंधनकारक आहे. याचे पालन व्हावे म्हणून राज्यपाल आणि महापौरांनाही प्रयत्न करावेत, कारण मास्कमुळे जीव वाचतो हे आपल्याला ठाऊक आहे.

कोविड-19 लस लवकरच मिळणार; WHOने दिली चांगली बातमी

सार्वजनिक वाहतुकीसाठी मास्क अनिवार्य करण्याचा आदेश ट्रम्प यांच्या प्रशासनाने शुक्रवारी फेटाळून लावला. माझ्यामते हे चुकीचे असून आणि फारसे तर्कसंगत नाही.

निवडणूक नजीक येत असताना बायडेन यांनी ट्रम्प यांच्यावरील आघाडी दोन अंकांमध्ये नेली आहे. मास्कच्या वापराचाचे भक्कम समर्थक असलेले बायडेन म्हणाले की, जागतिक पातळीवर मास्कची सक्ती झाली असती तर जानेवारीपासून आतापर्यंत एक लाख जीव वाचले असते असे तज्ज्ञांनी म्हटले आहे. मी कित्येक महिन्यांपूर्वीच पाठिंबा दिल्याची तुम्हाला कल्पना आहे. आता त्यांनी (ट्रम्प) सुद्धा हे करावे.

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Support the use of masks joe biden