भारताला योग्य वेळी पसंतीच्या ठिकाणी प्रत्युत्तर देऊ : इम्रान खान

वृत्तसंस्था
मंगळवार, 26 फेब्रुवारी 2019

भारतानं अवाजवी आक्रमकता दाखवली असून पाकिस्तान योग्य त्यावेळी व स्वत:च्या पसंतीच्या ठिकाणी प्रत्युत्तर देऊ असा इशारा पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी दिला आहे. पाकिस्तानमधील बालाकोट येथील दहशतवाद्यांच्या तळावर भारतीय हवाई दलाने एअर स्ट्राइक केल्यानंतर पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी राष्ट्रीय सुरक्षा समितीची तातडीची बैठक घेतली असून पुढील रुपरेषा ठरविण्याची शक्यता आहे.

लाहोर- भारतानं अवाजवी आक्रमकता दाखवली असून पाकिस्तान योग्य त्यावेळी व स्वत:च्या पसंतीच्या ठिकाणी प्रत्युत्तर देऊ असा इशारा पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी दिला आहे. पाकिस्तानमधील बालाकोट येथील दहशतवाद्यांच्या तळावर भारतीय हवाई दलाने एअर स्ट्राइक केल्यानंतर पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी राष्ट्रीय सुरक्षा समितीची तातडीची बैठक घेतली असून पुढील रुपरेषा ठरविण्याची शक्यता आहे.

राष्ट्रीय सुरक्षा समितीची बैठक झाल्यानंतर इम्रान खान यांनी भारताला धमकी दिली आहे. त्याचबरोर, पाकिस्तनी सेनेला आणि जनतेला सज्ज राहण्याचेही आदेश देण्यात आले आहेत. यावरून भारताने केलेल्या हल्यानंतर पाकिस्तान बिथरला असल्याचे स्पष्ट दिसत आहे. भारताच्या कारवाईने पाकिस्तानला धडकी भरली असल्याचे पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्या हालचालीवरून जाणवत आहे.

दरम्यान, पुलवामा येथे दहशतवादी हल्ला झाल्यानंतर संपूर्ण देश दु:खात होता. परंतु असे असताना संपूर्ण देश सैन्याच्या पाठीशी उभा राहिला होता. कोणतेही राजकारण न करता सर्व भारतीय जनता आणि सर्वच राजकीय पक्ष त्यांच्या पाठीमागे उभे राहिले होते. आज भारतीय हवाईदलाने पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून हल्ला केला. त्यामध्ये जवळजवळ 300 दहशतवाद्यांचा खात्मा केला आणि आपली सर्व विमाने सुखरूप परत आली. यामध्ये जैश ए मोहम्मद, हिजाबुल मुझाहिद्दीन, लष्करे ए तोयबा अशा अनेक अतिरेकी संघटनांचे कंबरडे मोडले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Surgical Strike 2 Pakistan Pm Imran Khan National Security Committee Meeting Warn India