सर्वेक्षणासाठी 10 हजार श्वानांची मदत

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 17 नोव्हेंबर 2019

श्वानांच्या जीवनमान सुधारण्याकरीता आणि त्यात वाढ करण्याकरीता एक सर्वेक्षण करण्यात येणार असून यासाठी तब्बल 10 हजार श्वानांची मदत घेण्यात येणार आहे. 

टेक्सास : माणसाचा सच्चा मित्र अशी ओळख असणाऱ्या श्वानाचा जीवळकाळ मात्र मानवाच्या तुलनेत बराच कमी असतो. श्वानांच्या जीवनमान सुधारण्याकरीता आणि त्यात वाढ करण्याकरीता एक सर्वेक्षण करण्यात येणार असून यासाठी तब्बल 10 हजार श्वानांची मदत घेण्यात येणार आहे. तसेच हे सर्वेक्षण तब्बल 10 वर्षे चालणार आहे. 

हे सर्वेक्षण टेक्सासचे ए अँड एम विद्यापीठ आणि वाँशिगटन स्कूल ऑफ मेडिसीन करणार आहे. या संपूर्ण सर्वेक्षणासाठी लागणारी आर्थिक मदत नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ एजिंग करणार आहे. ही नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थचीच शाखा आहे. या सर्वेक्षणासाठी अमेरिकेतील 50 राज्यातील श्वानांची मदत घेण्यात येणार आहे. विशेष म्हणजे यासाठी प्रत्येकजण आपल्या पाळीव श्वानाला पाठवू शकणार आहे. यासाठी सर्वेक्षणकर्त्यांनी एका वेबसाईटवर आपल्या श्वानाची माहिती टाकणे आवश्यक आहे. या सर्व प्रक्रियेकरता केवळ 10 मिनिटे लागणार असल्याचे सर्वेक्षणकर्त्यांनी सांगितले आहे. 

या संपूर्ण सर्वेक्षणानंतर श्वानांच्या जीवनमानाबद्दल आणखी माहिती मिळणार असल्याचे मत संबधित अभ्यासकांनी दिले असून यामुळे श्वानांचे जीवनमान वाढण्याकरीता देखील मदत होणार आहे असेही त्यांनी सांगितले आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: for survey 10,000 dogs will help