
जेरुसलेम : इस्राईलने अन्न, इंधन, औषधे व इतर वस्तूंचा पुरवठा रोखल्यामुळे गाझा पट्टीत सुमारे २० लाखांहून अधिक लोकांचा जगण्यासाठी संघर्ष सुरू आहे. इस्त्राईलच्या या कृत्यामुळे महागाई गगनाला भिडली असून गाझा पट्टीत मानवतावादी संघटनांकडून कमी होत चाललेल्या साठ्यांचे गरजू लोकांना वाटप करण्यात येत आहे.