बाल्टिक महासागरात स्वीडनचा लष्करी सराव

वृत्तसंस्था
Thursday, 27 August 2020

रशियन नौदलाच्या चार नौका लॅट्वियाच्या सागरी हद्दीत, तर नाटो सागरी दलाच्या दोन युद्धनौका लिथुएनियाच्या क्लैपेडा बंदरात दिसल्याचे वृत्त बाल्टिक न्यूज सर्व्हिसने दिले. स्वीडन हा नाटो समूहातील देश नाही.

स्टॉकहोम - आग्नेय आणि दक्षिण बाल्टिक महासागरात उच्च पातळीचा लष्करी सराव केल्याची माहिती स्वीडनकडून देण्यात आली. रशिया आणि नाटो समूहातील देशांनी लष्करी सराव केल्यामुळे या भागात सध्या अशा हालचालींचे प्रमाण वाढले आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

रशियन नौदलाच्या चार नौका लॅट्वियाच्या सागरी हद्दीत, तर नाटो सागरी दलाच्या दोन युद्धनौका लिथुएनियाच्या क्लैपेडा बंदरात दिसल्याचे वृत्त बाल्टिक न्यूज सर्व्हिसने दिले. स्वीडन हा नाटो समूहातील देश नाही. याविषयी आणखी तपशील देण्यात आला नाही, पण सागरी गस्तीचे प्रमाण वाढविले असून हवाई दल आणि लष्कराने उच्च पातळीवरील सज्जतेची क्षमता साध्य करण्याचा उद्देश असल्याचे सांगण्यात आले. संयुक्त सरावाचे प्रमुख व्हाईस अॅडमीरल यान थॉर्नक्वीस्ट यांनी सांगितले की, शीतयुद्धाच्या काळानंतर अशा हालचाली प्रथमच दिसल्या.

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sweden military exercises in the Baltic Sea