Swedish Woman In Nagpur: जन्मदात्या आईच्या शोधात स्वीडनमधील महिला पोहोचली नागपुरात! म्हणाली, एकदा तिला भेटायचंय अन्...

Swedish Woman In Nagpur: स्वीडनमधील एक महिला आपल्या जन्मदात्या आईचा शोध घेण्यासाठी भारतात आली आहे. तिने नागपूरच्या कानाकोपऱ्याचा शोध घेतला. सर्व सरकारी रेकॉर्ड तपासले, पण काही माहिती मिळाली नाही. मात्र, आईला भेटल्याशिवाय परत जाणार नाही, अशी शपथ तिने घेतली आहे.
Swedish Woman In Nagpur
Swedish Woman In NagpurEsakal

Swedish Woman In Nagpur: आपल्या जन्मदात्या आईच्या शोधात एक मुलगी साता समुद्र पार करत भारतात आली आहे. कोणीतरी मला माझ्या आईचा पत्ता द्या, मला तिला एकदा भेटू द्या. मला तिला भेटायचं आहे, तिला मिठी मारायची आहे. मला तिच्या मांडीवर डोकं ठेवून शांतपणे झोपायचं आहे. मला तिच्याबद्दल कोणताही राग नाही, तिने मला सोडले, त्यासाठी काही हरकत नाही, परंतु मला तिला भेटण्याची इच्छा आहे. आपल्या जन्मदात्या आईच्या शोधात सातासमुद्रापार आलेल्या महिलेचे हे गाऱ्हाणं आहे.

४१ वर्षांची पेट्रीसिया एरिकसन ही स्वीडनवरून भारतात आपल्या आईला शोधत आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ती एक अविवाहित आई बनली आणि नंतर तिने तिच्या मुलीला अनाथाश्रमात सोडले. त्या मुलीला एका स्वीडिश कुटुंबाने दत्तक घेतले होते आणि आता 40 वर्षांनंतर ती आपल्या जन्मदाच्या आईला शोधण्यासाठी भारतात आली आहे. आईला भेटल्याशिवाय परत जाणाक नाही, असे तिचं म्हणणं आहे.

Swedish Woman In Nagpur
मराठा तरुणांसाठी खुशखबर! नोकरी, शिक्षणासाठी आता ‘SEBC’चे प्रमाणपत्र 12 ते 15 दिवसांत; सोलापूर जिल्ह्यातील 327 जणांना 15 दिवसांत प्रमाणपत्र वितरीत

सरकारी नोंदी तपासल्या

मीडिया रिपोर्ट्सनुसार, पेट्रीसियाने सांगितले की, तिचा जन्म फेब्रुवारी 1983 मध्ये झाला होता, परंतु तिची आई, जी अविवाहित आई होती, तिला अनाथाश्रमात सोडून गेली. जेव्हा ती एक वर्षाची होती, तेव्हा एका स्वीडिश कुटुंबाने तिला दत्तक घेतले आणि स्वीडनला नेले. तिची जन्मदाती आई भारतात असल्याचे समजताच ती आईला शोधण्यासाठी भारतात आली.

तिच्या आईने सोडलेल्या त्या अनाथ आश्रमात देखील गेली होती. पंरतु त्या ठिकाणी तिला कोणतीही माहिती मिळाली नाही. पेट्रीसियाने भारतीय नियमांनुसार ज्या ज्या ठिकाणी पालकांचे रेकॉर्ड असतात, त्या त्या सर्व ठिकाणी माहिती घेण्याचा प्रयत्न केला मात्र, तिला तिच्या जन्मदात्या आईची कोणती माहिती मिळाली नाही. अंगणवाड्या, शाळा, पोलीस स्टेशन, शांतीनगर येथील जुन्या भागातही भेट दिली, मात्र तिला आईची कोणतीही माहिती सापडली नाही.

Swedish Woman In Nagpur
मतदान अचूक झाल्याची ‘व्हीव्हीपॅट’मधून होईल खात्री! विनाकारणाचा संशय येईल अंगलट; ‘त्या’ मतदारांसाठी चाचणी मतदानाचाही पर्याय

अनाथाश्रमातही मिळाली नाही कोणती माहिती

पेट्रीसिया सांगते की तिला फक्त आईचे नाव माहित आहे, सोमवारी ती तिच्या शोधात रेड-लाइट डिस्ट्रिक्टमध्ये गेली, परंतु तेथे तिला शांता नावाची कोणतीही महिला सापडली नाही. पॅट्रिसिया म्हणते की ती 3 मुलांची आई आहे आणि आई होण्याचा अर्थ तिला समजू शकतो. मी माझ्या स्वीडिश पालकांची मनापासून आभारी आहे, त्यांनी मला चांगलं वाढवलं. त्याच्या कृतज्ञतेसाठी माझ्याकडे शब्द नाहीत.

लहानपणापासूनच पेट्रीसियाला तिच्या आईला भेटण्याची इच्छा होती. तिच्या शोधात ती आता भारतात आली असून महाराष्ट्र राज्यातील नागपूर येथे ती तिच्या आईचा कोनाकोपऱ्यापर्यंत शोध घेत आहे.

Swedish Woman In Nagpur
Maharashtra Revenue : महाराष्ट्र सर्वाधिक महसूल देणारे राज्य ; दस्तनोंदणीतून ५० हजार कोटींचे उत्पन्न; २७ लाखांहून अधिक व्यवहार

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com