
रोन ग्लेशियर (स्वित्झर्लंड) : हवामान बदलाचे जगभरात विविध परिणाम होत आहेत. आता स्वित्झर्लंडमधील हिमनद्यांना हवामान बदलामुळे छिद्रे पडली असून त्या स्वीस चीजप्रमाणे छिद्रयुक्त झाल्याचे समोर आले आहे. ‘ग्लामोस’ या हिमनद्यांवर देखरेख ठेवणाऱ्या गटाचे हिमनदी तज्ज्ञ मॅथिएस हुस यांनी ऱ्होन हिमनदीचे उदाहरण दिले. स्वित्झर्लंडसह फ्रान्समधून वाहत जाऊन भूमध्य समुद्रात वाहणाऱ्या याच नावाच्या नदीला या हिमनदीमुळे पाणी मिळते.