स्वित्झर्लंडमध्ये बुरख्यावर बंदी; सार्वजनिक ठिकाणी झाकता येणार नाही चेहरा

सकाळ वृत्तसेवा
Monday, 8 March 2021

मतदानाद्वारे हा निर्णय घेण्यात आला आहे. आणि त्यानुसार, लोकांनी देशातील मुस्लिम महिलांच्या बुरखा घालण्यावर बंदी आणण्यासंदर्भात मंजूरी दिली आहे.

स्वित्झर्लंड : स्वित्झर्लंडमध्ये सार्वजनिक ठिकाणी संपूर्णपणे चेहरा झाकण्यावर बंदी घालण्यात आली आहे. यामध्ये बुरखा अथवा नकाब घालण्यावर देखील बंदी घालण्यात आली आहे. मतदानाद्वारे हा निर्णय घेण्यात आला आहे. आणि त्यानुसार, लोकांनी देशातील मुस्लिम महिलांच्या बुरखा घालण्यावर बंदी आणण्यासंदर्भात मंजूरी दिली आहे. मतदानानंतर मंजूर झालेल्या या प्रस्तावामुळे आता रेस्त्रां, खेळाची मैदाने, सार्वजनिक वाहतुक तसेच रस्त्यावर चालताना देखील चेहरा झाकण्यावर बंदी घालण्यात आली आहे. मात्र, याला काही अपवादांना मंजूरी देण्यात आली आहे. यामध्ये, धार्मिक ठिकाणी जाताना अथवा कोरोनासारख्या आरोग्याच्या कारणांसाठी मास्क घालण्याबाबत सूट राहिल. या प्रस्तावामध्ये थेट इस्लामचा उल्लेख केला गेला नव्हता. मात्र, यास व्यापक रुपाने बुरखा प्रतिबंधाच्या दृष्टीनेच पाहिलं जातंय.

हेही वाचा - राज्यातील कोरोनावाढीवर केंद्राचा अहवाल; या कारणांमुळे महाराष्ट्रात वाढला कोरोना

ब्रॉडकास्टर SRF ने सांगितलं की 50 टक्क्यांहून अधिक लोकांनी बुरखा  बंदीच्या बाजूने मतदान केलं आहे. जवळपास 51.21 टक्के मतदाते हे बुरखा अथवा नकाबला बेकायदेशीर घोषित करण्याच्या बाजूनने होते. याआधी जनमताच्या सर्वेक्षणांमध्ये देखील याचे संकेत देण्यात आले होते की बुरख्यावर बंदी आणण्याबाबतचा कायदा बनवला जाईल. यावर्षीच्या सुरवातीला ल्यूसर्न युनिव्हर्सिटीने एका सर्व्हेमध्ये असा दावा केला होता की, स्वित्झर्लंडमधील एकही महिला बुरखा परिधान करत नाही. तर 30 टक्के महिला अशा आहेत, ज्या सार्वजनिक ठिकाणी नकाब घालून चेहरा झाकतात. हा प्रस्ताव स्वित्झर्लंडमध्ये राहणाऱ्या मुस्लिम समुदायाच्या विरोधातील निर्णय म्हणून पाहिलं जात आहे. 

या प्रस्तावावर टीका
सीएनएनने दिलेल्या माहितीनुसार, उजव्या विचारसरणीच्या पीपल्स पार्टीसहित अनेक समुहांकडून प्रस्ताविक प्रस्तावामध्ये इस्लामचा विशेष रुपाने उल्लेख केला गेला नाहीये. मात्र, यास व्यापक रुपाने बुरखा प्रतिबंधाच्या दृष्टीनेच पाहिलं जातंय. स्विस धार्मिक संघटना, मानवाधिकार आणि नागरिकांच्या काही संघटना तसेच संघीय सरकारकडून या  प्रस्तावावर टीका करण्यात आली आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Switzerland referendum People vote to ban full face coverings in public places