
दमास्कस : सीरियामधील सरकारविरोधी सशस्त्र गटांनी आज सरकारचे नियंत्रण असलेल्या भागांवर मोठा हल्ला केला आणि काही भागाचा ताबाही मिळविला. याला प्रत्युत्तर म्हणून सरकारी सैन्यदलांनी या भागामध्ये जोरदार हवाई हल्ले केले, तसेच रणगाड्यांद्वारेही तोफगोळ्यांचा मारा केला.