दमास्कस (सीरिया) : सीरियाची राजधानी दमास्कस (Syria Damascus) येथे रविवारी एका चर्चमध्ये घडलेल्या भीषण आत्मघातकी हल्ल्याने संपूर्ण परिसर हादरला. ड्वेइला भागातील सेंट मार एलियास चर्चमध्ये (St. Mar Elias Church) प्रार्थनेसाठी जमलेल्या लोकांवर दहशतवादी हल्ला झाला. या हल्ल्यात कमीत कमी २० नागरिक ठार झाले असून अनेकजण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे.