हद्दीत आलात तर बघून घेऊ; चीनला या छोट्या देशाची धमकी!

वृत्तसंस्था
Friday, 11 September 2020

तैवानला शांतता हवी आहे", असं मत तैवानचे उपाध्यक्ष लाई चिंग टे यांनी ट्विट करून मांडली आहे. बुधवारी आणि गुरुवारी चिनी विमानांनी दोनदा तैवानच्या हवाई क्षेत्रात प्रवेश केला होता.

ताइपे : चीन आपल्या शेजारी देशांशी नेहमी भांडताना दिसून येतो. सध्या भारत-चीन सीमावाद मुद्दा चर्चेत असतानाच आता चीनला तैवानचे  (Taiwan) उपराष्ट्रपती लाई चिंग टे (Lai Ching-te) यांनी वारंवार सीमा ओलांडून तैवानच्या हद्दीत  आल्याने सुनावलं आहे. चिनी लढाऊ विमाने सीमेचे सतत उल्लंघन करून तैवानमध्ये येत आहे आणि असंच जर सुरू राहिलं तर चीनला याचे वाईट परिणाम भोगावे लागतील, अशी धमकी चीनला दिली आहे. मागील काही दिवसांपासून चिनी लढाऊ विमानांनी तैवानची सीमा किमान तीन वेळा प्रवेश केला आहे.  

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

 "चीनने गुरुवारी पुन्हा तैवानच्या हवाई संरक्षण  विभागात आपले लढाऊ विमान उडविले होते. चीनने सीमारेषा ओलांडू नये पण चीन असं वारंवार करत आहे. तैवानला शांतता हवी आहे", असं मत तैवानचे उपाध्यक्ष लाई चिंग टे यांनी ट्विट करून मांडली आहे. बुधवारी आणि गुरुवारी चिनी विमानांनी दोनदा तैवानच्या हवाई क्षेत्रात प्रवेश केला होता. चीनच्या या कृतीस तैवानने चिथावणीखोर कृत्य असंही म्हटलं असून प्रादेशिक शांतता आणि देशातील स्थिरतेसाठी हे कृत्य गंभीर धोका असल्याचे सांगितले आहे.

 चीनला योग्य उत्तर देऊ-
 तैवानच्या परराष्ट्र मंत्रालयाने गुरुवार केलेल्या चीनच्या घूसखोरीचा निषेध केला असून याचं प्रत्युत्तर लवकरच दिलं जाईल, असं तैवानने सांगितलं आहे. तैवानची लोकसंख्या 2 कोटी 30 लाख असून चीन तैवानला आपला प्रदेश मानत आला आहे.  तैवानने म्हटले आहे की चीनच्या या कारवायांमुळे आमचा संपूर्ण प्रदेश धोक्यात आला आहे. चीनच्या अशा कुरापतींची तक्रार तैवानने युनायटेड नेशनकडे बऱ्याचदा केली आहे. 

 चीन नेहमी 'तैवान'वर दावा करत आला आहे-
 विशेष म्हणजे चीन पहिल्यापासून तैवानवर दावा करत आला आहे.  यापुर्वी चीनच्या कम्युनिस्ट पक्षाने तैवानवर हल्ला करण्याचीही धमकी दिली होती. चीनच्या विरोधामुळे तैवानला आतापर्यंत जागतिक आरोग्य संघटनेचं सदस्यत्व भेटलं नाहीये. तैवानमध्ये डेमोक्रॅटिक प्रोग्रेसिव्ह पार्टीची सत्ता आल्यापासून चीनशी असलेले संबंध बिघडू लागले आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Taiwan threatens China with for repeated invasion in Taiwan Air Defense Identification Zone