अरं किती खोटं बोलावं; पाक म्हणतं 'तक्षशिला इथली, चाणक्य-पाणिनी आमचं भूषण'

सकाळ न्यूज नेटवर्क
Monday, 14 December 2020

भारताविरोधात दहशतवाद पसरवणारा पाकिस्तान आता भारतीय उपमहाद्वीपचा प्राचीन इतिहास बदलण्याचा प्रयत्न करत आहे.

इस्लामाबाद- भारताविरोधात दहशतवाद पसरवणारा पाकिस्तान आता भारतीय उपमहाद्वीपचा प्राचीन इतिहास बदलण्याचा प्रयत्न करत आहे. स्वत:ला व्हिएतनाममधील पाकिस्तानचा राजदूत सांगणारे कमर अब्बास खोखर यांनी प्राचीन भारताची शान असणाऱ्या तक्षशिला विश्वविद्यालयाला प्राचीन पाकिस्तान म्हटलं आहे. त्यांनी सोशल मीडियावर ही पोस्ट टाकली आहे.  

खोखर यांनी तक्षशिला विश्वविद्यालाचा फोटो ट्विट करुन म्हटलंय की, ''तक्षशिला विश्वविद्यालयाचा हा फोटो असून त्याला पुन्हा बनवलं जात आहे. ही युनिव्हर्सिटी प्राचीन पाकिस्तानमध्ये आजपासून 2700 वर्षांपूर्वी इस्लामाबादमध्ये होती. या विश्वविद्यालयात 16 देशांचे विद्यार्थी 64 विविध भाष्यांमध्ये ज्ञान प्राप्त करत होते.  पाणिनीसारखे विद्वान याठिकाणी शिकवायचे.''

पाणिनी आणि चाणाक्य दोघेही पाकिस्तानचे पुत्र

तक्षशिला विश्वविद्यालयाला प्राचीन पाकिस्तानचा भाग असल्याचं म्हटल्यामुळे सोशल मीडियावर वातावरण चांगलेच तापलं आहे. पाकिस्तानचा जन्म 14 ऑगस्ट 1947 मध्ये झाला. याआधी पाकिस्तानचे अस्तित्व नव्हते. चाणक्य भारतीय उपमहाद्वीपचे राजा चंद्रगुप्त मौर्य यांचे मंत्री होते. त्यांच्या साम्राज्याची राजधानी पाटलीपुत्र (पाटणा) होती. 

राजकारण सोडण्याची नौटंकी; कमलनाथ यांचे वक्तव्य नेमकं कशासाठी?

पाकिस्तान आता खोटा इतिहास जगाला सांगत आहे. खोखर इथेच थांबले नाहीत, ते म्हणाले की, ''जगातील पहिले भाषातज्ज्ञ पाणिनी आणि जगभरातील चर्चीत राजनैतिक तज्ज्ञ चाणक्य दोघेही पाकिस्तानचे पुत्र आहेत.'' पाकिस्तान नेहमीच भारतीय उपमहाद्विपाचा खोटा इतिहास शाळेच्या पाठ्यपुस्तकातून शिकवत आला आहे. 

पाकिस्तान ऐतिहासिक तथ्यांसोबत छेडछाड करत आला आहे. पाकिस्तानमध्ये हे काम सातत्याने होत आहे. शाळेत शिकवल्या जाणाऱ्या इतिहासातच खोटी माहिती देण्यात आली आहे. याद्वारे मुलांच्या मनात भारतविरोध वाढवला जात आहे. 1948 साली पाकिस्तानच्या तत्कालीन शिक्षण मंत्र्यांनी इतिहास प्रामाणिकतेच्या आधारावर देण्याचा प्रयत्न केला. पण त्यानंतर त्याच्या उलट घडून आले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: takshshila is in ancient pakistan chanakya and panini son of the soil