

Smoke rises near a military installation amid escalating tensions between Taliban forces and Pakistan following reported cross-border airstrikes.
esakal
एकीकडे अमेरिका इस्त्रायल अन् इराणमध्ये युद्ध सुरु झाले असून मध्य आशियातील देशांना याची धग जाणवत असतानाच अफगाणिस्तानच्या तालिबानच्या संरक्षण मंत्रालयाने दावा केला आहे की त्यांनी पाकिस्तानमधील अनेक प्रमुख लष्करी ठिकाणांवर यशस्वीरित्या हवाई हल्ले केले आहेत. मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, पाकिस्तानने अफगाणिस्तानच्या हद्दीत नुकतेच केलेल्या हवाई हल्ल्यांना प्रत्युत्तर म्हणून ही कारवाई करण्यात आली.