तालिबानच्या 44 सदस्यांची राज्यपालासह पोलिस प्रमुख पदांवर नियुक्ती I Afghanistan | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Afghanistan

अफगाणिस्तानवर (Afghanistan) ताबा मिळवल्यानंतर तालिबाननं नुकतीच अंतरिम सरकारची (Taliban Government) घोषणा केलीय.

तालिबानच्या 44 सदस्यांची राज्यपालासह पोलिस प्रमुख पदांवर नियुक्ती

अफगाणिस्तान : अफगाणिस्तानवर (Afghanistan) ताबा मिळवल्यानंतर तालिबाननं नुकतीच अंतरिम सरकारची (Taliban Government) घोषणा केलीय. मीडिया रिपोर्ट्सनुसार, तालिबाननं आपल्या 44 सदस्यांना प्रांतीय गव्हर्नर आणि पोलिस प्रमुख यासारख्या महत्त्वाच्या पदांवर नियुक्त केलंय. देशातील शासन व्यवस्था बळकट व्हावी, यासाठी हे पाऊल उचलण्यात आलंय. तालिबानच्या ताब्यात आल्यापासून युद्धग्रस्त अफगाणिस्तान सुरक्षा आणि आर्थिक आव्हानांना तोंड देत आहे.

सप्टेंबरमध्ये अंतरिम सरकार स्थापन झाल्यानंतर तालिबानची ही पहिलीच मोठ्या प्रमाणावर नियुक्ती होती. तालिबाननं जारी केलेल्या यादीनुसार, कारी बरयाल (Qari Baryal) यांची काबूलच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आलीय, तर वाली जान हमजा (Wali Jan Hamza) शहराचे पोलीस प्रमुख म्हणून काम पाहतील. हमजांच्या आधी या पदावर असलेले मौलवी हमदुल्ला मुखलिस हे गेल्या आठवड्यात अफगाणिस्तानातील सर्वात मोठ्या लष्करी रुग्णालयावर झालेल्या हल्ल्यात ठार झाले होते. या हल्ल्यात 25 जणांचा मृत्यू झाला असून 50 हून अधिक जण जखमी झाले आहेत.

हेही वाचा: इंडो-पॅसिफिक महासागरातून चीन अमेरिकेला करणार उद्धवस्त?

तालिबानच्या ताब्यात आल्यापासून अफगाणिस्तानात सातत्याने स्फोट होत आहेत. यावरून तालिबाननं ताबा मिळवल्यानंतर युद्धग्रस्त देशात शांतता आणि सुरक्षा प्रस्थापित करण्याचे दिलेले आश्वासन पोकळ असल्याचं स्पष्ट होत आहे. देशातील सुरक्षा परिस्थितीमुळे दहशतवादी गटांचे आश्रयस्थान बनण्याच्या संभाव्यतेबद्दल चिंता निर्माण झालीय. 15 ऑगस्ट रोजी तालिबाननं सत्ता हाती घेतल्यापासून देशाची अर्थव्यवस्थाही कोलमडून पडलीय. अलीकडेच तालिबाननं अफगाणिस्तानात परकीय चलनाच्या वापरावर देखील बंदी घातलीय. त्यात म्हटलंय, की सर्व अफगाण नागरिकांनी कोणत्याही व्यवसायासाठी अफगाण रुपयाचा वापर करावा, असं आवाहन त्यांनी केलंय.

हेही वाचा: धक्कादायक! शौचालयातील पाण्याचा 30 वर्षांपासून पिण्यासाठी वापर

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top