ग्लोबल
Taliban Ban Chess : अफगाणिस्तानातील लोक आता बुद्धिबळ खेळू शकणार नाहीत; तालिबान सरकारने सांगितले बंदीचे 'हे' मोठे कारण
Taliban : अफगाणिस्तानातील तालिबानने बंदी घातलेला हा पहिलाच खेळ नाही. सर्वात वाईट परिस्थिती तिथल्या महिलांची आहे. त्यांना कोणत्याही प्रकारच्या खेळात भाग घेण्याची परवानगी नाही, त्यांच्यासाठी प्रत्येक खेळावर बंदी आहे.
अफगाणिस्तानातील तालिबान सरकारने पुढील सूचना मिळेपर्यंत बुद्धिबळ खेळावर बंदी घातली आहे. तालिबानला भीती आहे की हा खेळ जुगाराचे साधन बनला आहे. एका इंग्रजी वृत्तवाहिनीच्या वृत्तानुसार, अधिकाऱ्यांनी सांगितले की, बुद्धिबळ खेळावर अनिश्चित काळासाठी बंदी घालण्यात आली आहे. प्रथम इस्लामिक कायद्यानुसार ते खेळणे योग्य आहे की नाही याची चौकशी केली जाईल, त्या आधारावर त्यावर कायमची बंदी घातली जाईल किंवा बंदी उठवली जाईल.

