esakal | काबुलमध्ये तालिबानकडून महिलेला मारहाण, मोर्चाला हिंसक वळण
sakal

बोलून बातमी शोधा

मारहाण झालेल महिला राबिया सादात

काबुलमध्ये तालिबानकडून महिलेला मारहाण, मोर्चाला हिंसक वळण

sakal_logo
By
दीनानाथ परब

काबुल: काबुलमध्ये (kabul) शनिवारी महिला करत असलेल्या आंदोलनाला हिंसक वळण (violent protest) लागलं. तोलो न्यूजने दिलेल्या वृत्तानुसार, राष्ट्राध्यक्षीय निवासस्थानाकडे जाणाऱ्या महिला आंदोलकांना तालिबानने (Taliban) रोखलं व त्यांना पांगवण्यासाठी अश्रूधुराच्या नळकांड्या (tear gas) फोडल्या. आंदोलना दरम्यान एक महिला जखमी झाली आहे.

एका व्हिडीओमध्ये राबिया सादात या महिलेच्या कपाळामधून रक्त वाहत असल्याचे दिसत आहे. दुसऱ्या व्हिडीओमध्ये तालिबानी, महिला मोर्चाला रोखत असल्याचे दिसत आहे. अफगाणि महिला रस्त्यावर उतरण्याचा हा सलग तिसरा दिवस आहे. या महिलांच्या हातात मागण्यांचे फलक होते. त्या घोषणा देत होत्या. शिक्षण आणि नोकरी सुरु ठेवण्याची परवानगी द्यावी, अशी या महिलांची मागणी आहे.

हेही वाचा: 'मंदिरं बंद आहेत, मग देव कुठे आहे?, तर देव...'

मताधिकार, प्रशासनात प्रतिनिधीत्व मिळावं, यासाठी सुद्धा अफगाणि महिला प्रयत्नशील आहेत. शिक्षण हा त्यांचा मुख्य चिंतेचा विषय आहे. अफगाणिस्तानात तालिबानची सत्ता येणार आहे. त्यांच्यापासून सर्वाधिक धोका महिलांनाच आहे. कारण यापूर्वीच्या राजवटीत तालिबानने महिलांचे हक्क, अधिकार दडपून टाकले होते.

loading image
go to top