esakal | 'मंदिरं बंद आहेत, मग देव कुठे आहे?, तर देव...'
sakal

बोलून बातमी शोधा

CM Uddhav Thackeray

'मंदिरं बंद आहेत, मग देव कुठे आहे?, तर देव...'

sakal_logo
By
टीम ई सकाळ

मुंबई : राज्यात मंदिरं बंद आहेत, प्रार्थनास्थळ बंद आहेत, तर देव कुठे आहेत? देव केवळ मंदिरात किंवा प्रार्थनास्थळात न राहता डॉक्टरांच्या रुपात आलेला आहे. हा खरा देव आहे. जो आपला जीव वाचवतोय. हे हॉस्पिटलसुद्धा एखाद्या मंदिरासारखं आहे, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) म्हणाले. आज मुंबईत नायर रुग्णालयाच्या शतक महोत्सवी (Nait hospital) कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी त्यांनी डॉक्टरांचे कौतुक केले.

हेही वाचा: ...अन्यथा राज्यात पुन्हा निर्बंध, अजित पवारांचा थेट इशारा

नायर रुग्णालयाचा १०० वर्षांचा प्रवास थक्क करणार आहे. एखाद्या संस्थेची सुरुवात होते. पण ते टिकविणे कठीण असते. प्रतिकूल काळात, भांडवलाचा पत्ता नसताना केवळ जिद्दीच्या बळावर काय होऊ शकते याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे नायर रुग्णालय आहे. व्यासपीठावर आमचीच गर्दी जास्त आणि डॉक्टर कमी आहेत. गेल्या १०० वर्षांत या रुग्णालयात डॉक्टरांनी जीव ओतून रुग्णाचे प्राण विचविण्याचे काम केले आहेत, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

अहोरात्र मेहनत काय असते ते रुग्णालयात पाहायला मिळते. व्यथा घेऊन आजाराने त्रस्त होऊन लोक रुग्णालयात येतात आणि हसत घरी जातात. कोविड काळात रुग्णालयाने काय केलंय हे सांगायची गरज नाही. सरकार येऊन २ महिने झाले आणि अनाकलनीय असा कोरोना व्हायरस आला. सुरुवातीचे दिवस कठीण होते. कोरोनाची दहशत होती. पण, त्या परिस्थितीतही डॉक्टरांनी चांगले काम केले. आज कौतुक आमचे होते. पण, खरे मानकरी डॉक्टर आणि आरोग्य कर्मचारी आहेत. या डॉक्टरांना आज मी मानाचा मुजरा करतो, असेही मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले.

loading image
go to top