esakal | पत्रकारांनी 'दहशतवादी' म्हणणं बंद करावं, अन्यथा..; तालिबानची माध्यमांना धमकी
sakal

बोलून बातमी शोधा

Taliban

टीटीपीसाठी अशी विशेषणं वापरणं माध्यमं आणि पत्रकारांची पक्षपाती भूमिका दर्शवते.

पत्रकारांनी 'दहशतवादी' म्हणणं बंद करावं, अन्यथा..

sakal_logo
By
बाळकृष्ण मधाळे

इस्लामाबाद : अफगाणिस्तानमध्ये (Afghanistan) तालिबानचं (Taliban) सरकार स्थापन झाल्यापासून 'तहरीक-ए-तालिबान-पाकिस्तान' (Tehrik-i-Taliban Pakistan) म्हणजेच, पाकिस्तानी तालिबाननं आपल्या माध्यम आणि पत्रकारांना धमकी देण्यास सुरुवात केलीय. टीटीपीनं म्हटलंय, की आता माध्यमांनी त्यांना दहशतवादी म्हणणं बंद करायला हवं, अन्यथा त्यांच्यासोबत शत्रूप्रमाणचं वागलं जाईल, तसेच प्रसारमाध्यमांनी आता 'तहरीक-ए-तालिबान-पाकिस्तान' असंच संबोधलायला हवं, असंही टीटीपीचे प्रवक्ते मोहम्मद खुरासानी यांनी सांगितलंय.

टीटीपीचे प्रवक्ते खुरासानी यांनी सोशल मीडियावर जाहीर केलेल्या निवेदनात म्हटलंय, की त्यांची संघटना माध्यमांच्या पत्रकारांवर लक्ष ठेवून आहे. ज्यात टीटीपीसाठी 'दहशतवादी आणि अतिरेकी' सारखी विशेषणे वापरली जातात, ती त्वरित थांबवली जावीत, अन्यथा वाईट परिणाम होतील, असं त्यांनी माध्यमांना धमकी वजा इशारा दिलाय.

हेही वाचा: बंदुकीचा धाक दाखवणाऱ्या तालिबानीसमोर महिलेनं रोखली 'नजर'

'डॉन' वृत्तपत्राने टीटीपीच्या ऑनलाइन वक्तव्याचा अहवाला देत म्हटलंय की, 'टीटीपीसाठी अशी विशेषणं वापरणं माध्यमं आणि पत्रकारांची पक्षपाती भूमिका दर्शवते, असं त्यांनी मत मांडलंय. 2007 मध्ये पाकिस्तानी तालिबानची स्थापना झाली. नागरिकांवरील हल्ल्यांनंतर सरकारनं ऑगस्ट 2008 मध्ये ही बंदी घातलेली संघटना म्हणून सूचीबद्ध केली. पहिला टीटीपी प्रमुख बैतुल्ला मेहसूद अमेरिकेच्या ड्रोन हल्ल्यात 2009 मध्ये ठार झाला. पाकिस्तान सरकारनं 2014 च्या राष्ट्रीय कृती आराखड्यात टीटीपीच्या सहयोगी गटांवर बंदी घातली होती. माध्यमांद्वारे तथाकथित 'दहशतवाद्यांचे गौरव' करण्यावरही बंदी होती. सरकारच्या दहशतवादीविरोधातील लढाईत आत्तापर्यंत अनेक पाकिस्तानी पत्रकार मारले गेले आहेत. अफगाणिस्तानची राजधानी काबुलमध्ये मंगळवारी रॅली पांगवण्यासाठी तालिबान सैन्याने नागरिकांवर गोळीबार केला आणि निदर्शनाचं कव्हर करणाऱ्या अनेक अफगाण पत्रकारांना अटक केलीय. या पत्रकारांच्या सुटकेची मागणी करत सोशल मीडियावर अनेक पोस्ट करण्यास सुरुवात केलीय.

loading image
go to top