भारतातल्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये तालिबानचे अधिकारी भाग घेणार; नेमकं प्रकरण काय? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Taliban News

भारतातल्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये तालिबानचे अधिकारी भाग घेणार; नेमकं प्रकरण काय?

नवी दिल्लीः तालिबान सरकारकडून एक मेमो त्यांच्या अधिकाऱ्यांसाठी काढण्यात आलेला आहे. परराष्ट्र मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांना भारताच्या ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सहभाग घेण्यास सांगण्यात आलेलं आहे. आजपासून १७ मार्चपर्यंत भारताने एका ट्रेनिंगचं आयोजन केलं आहे.

हा मेमो तालिबानच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या इंस्टिट्यूट ऑफ डिप्लोमसीचे महासंचालक मुफ्ती नुरुल्लाह अज्जाम यांच्या वतीने देण्यात आलेला आहे. यामध्ये म्हटलंय की, भारतीय दूतावासाकडून एक अनौपचारिक माहिती मिळाली असून IIM ने परराष्ट्र मंत्रालयाच्या कर्मचाऱ्यांसाठी एक छोटं ट्रेनिंन आयोजित केलं आहे.

हेही वाचाः हिंडेनबर्ग अहवालात तथ्य की ते भारताविरुद्धचे कारस्थान?

२०२१च्या ऑगस्ट महिन्यात तालिबानने काबुलवर ताबा मिळवल्यानंतर ही पहिलीच संधी आहे. त्यामुळे भारताच्या वतीने देण्यात येणाऱ्या ट्रेनिंगमध्ये तालिबानचे अधिकारी सहभागी होतील.

परराष्ट्र मंत्रालयाकडून यावर अद्याप कुठलीच प्रतिक्रिया आलेली नाही. भारतातील सूत्र मात्र ही ट्रेनिंग तालिबानसाठी आयोजित केली नसल्याचं सांगत आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार हा एक ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राम असून परराष्ट्र मंत्रालयाच्या देखरेखीखाली आयआयएमच्या वतीने हा उपक्रम राबवण्यात येतो.

हे ट्रेनिंग अनेक देशांच्या अधिकाऱ्यांसाठी खुलं असतं. ते केवळ अफगाणिस्तानसाठी नाही तर यामध्ये सहभाग घेण्यासाठी कुणालाही रोखता येत नाही.

भारतीय व्यापार, पर्यावरण, सांस्कृतिक वारसा याबाबत ट्रेनिंगमध्ये माहिती दिली जाणार आहे. इमर्सिंग विथ इंडियन थॉट्स असं नाव या ट्रेनिंग प्रोग्रामला देण्यात आलेलं आहे.

टॅग्स :Trainingtaliban