पत्रकारितेच्या तत्त्वांचं उल्लंघन; तालिबाननं केलं 'व्हॉइस ऑफ अमेरिका'चं प्रसारण बंद I Taliban Government | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Taliban Government

व्हॉईस ऑफ अमेरिका आणि RFE ला यूएस सरकारकडून निधी दिला जातो.

Taliban Government : पत्रकारितेच्या तत्त्वांचं उल्लंघन; तालिबाननं केलं 'व्हॉइस ऑफ अमेरिका'चं प्रसारण बंद

तालिबाननं (Taliban) काल (गुरुवार) यूएस सरकारचं (US Government) व्हॉइस ऑफ अमेरिका (Voice of America VOA) आणि रेडिओ फ्री युरोप/रेडिओ लिबर्टीचं एफएम रेडिओ (Liberty FM Radio) प्रसारण बंद केलं. तालिबाननं प्रसारण बंद करण्यामागं पत्रकारितेच्या तत्त्वांचं पालन न केल्याचं कारण सांगितलं.

व्हॉईस ऑफ अमेरिका आणि RFE ला यूएस सरकारकडून निधी दिला जातो. अफगाणिस्तानमधील (Afghanistan) माहिती आणि संस्कृती मंत्रालयाच्या प्रसारणावर देखरेख करणारे अब्दुल हक हम्माद यांनी ट्विट केलंय की, अमेरिकेच्या ताब्यानंतर प्रसारण सुरू झालेल्या रेडिओ लिबर्टीच्या पत्रकारितेवर बंदी घालण्यात आलीय. नियमांचं पालन न केल्यामुळं ते 13 प्रांतांमध्ये बंद करण्यात आलं आहे.

'व्हॉईस ऑफ अमेरिका'वर 1 डिसेंबरपासून बंदी

VOA अधिकाऱ्यांनी सांगितलं की, अफगाणिस्तानच्या माहिती आणि संस्कृती मंत्रालयाच्या नवीन निर्देशानुसार VOA च्या प्रसारणावर 1 डिसेंबरपासून बंदी घातली आहे. व्हॉईस ऑफ अमेरिका टेलिव्हिजन कार्यक्रम हा आशना टीव्ही म्हणून ओळखला जातो. यापूर्वी टोलो टीव्ही, टोलोन्यूज आणि लामर टीव्ही चॅनेलवर प्रसारित झाला होता.