esakal | अफगाणिस्तानात तालिबान उद्याच करणार सत्ता स्थापन?
sakal

बोलून बातमी शोधा

Taliban

अफगाणिस्तानात तालिबान उद्याच करणार सत्ता स्थापन?

sakal_logo
By
सुधीर काकडे

अमेरिकेने (US) २० वर्षांनंतर अफगाणिस्तामधील (Afghanistan) आपले सैन्य मागे घेतले आणि ३१ ऑगस्टला अमेरिकेच्या शेवटच्या सैनिकाने अफगाणिस्तान सोडले. यावेळी तालिबानने (Taliban) मोठा जल्लोष साजरा केला. तालिबानने अफगाणिस्तानवर ताबा मिळवला असून पंजशीर वगळता संपुर्ण देशावर तालिबानचे आज वर्चस्व आहे. अमेरिकेने देश सोडल्यानंतर आता तालिबानकडून सत्तास्थापनेच्या हालचाली वेगाने सुरु झाल्या आहेत. त्यातच आता शुक्रवारी तालिबान सत्ता स्थापन करणार असल्याची माहिती मिळाली आहे.

अमेरिकन सैन्याने माघार घेतल्यानंतर तालिबानने अफगाणिस्तानमधील एक एक शहर ताब्यात घ्यायला सुरुवात केली आणि १५ ऑगस्ट रोजी राजधीनी काबूलवर तालिबानचा ध्वज फडकावला. या दरम्यान काबूलमधील हमीद करझई विमानतळावरू वेगवेगळ्या देशातील तब्बल १ लाख २२ हजारांपेक्षा जास्त लोकांनी देश सोडला. अमेरिकेने देखील दुतावासातील कर्मचारी आणि सैन्याला अफगाणिस्तानच्या बाहेर काढले. त्यानंतर ३ सप्टेंबरला शुक्रवारच्या प्रार्थनेच्या वेळी तालिबान आपले सरकार स्थापन करणार असल्याची माहिती इंडिया टुडेने दिलेल्या वृत्तामधून समोर आली आहे.

हेही वाचा: आर्थिक संकट, पण तालिबान गडगंज श्रीमंत, कुठून येतोय इतका पैसा?

तालिबानने केली आपल्या प्रमुख नेत्याची घोषणा

अफगाणिस्तानवर ताबा मिळवल्यानंतर तालिबानचे वेगवेगळे प्रवक्ते तालिबानची भुमिका मांडताना दिसत होते. मात्र तालिबानचा प्रमुख हिबतुल्लाह अखुंदजादा हा माध्यमांसमोर आल्याचे पहायला मिळाले नाही. त्यातच आता तालिबानने हिबतुल्लाह अखुंदजादा हा आपला प्रमूख नेता असल्याचे घोषित केले आहे. अफगाणिस्तानमधील टोलो न्यूजच्या हवाल्याने, तालिबान नेता ईनामुल्लाह समनगनीने स्पष्ट केले की, हिबतुल्लाह अखुंदजादा हाच तालिबान प्रमुख असून लवकरच तालिबान सत्तेची स्थापना करणार आहे.

सरकार स्थापन करण्यासाठी सुरु असलेली चर्चा पुर्ण झाली असून नव्या मंत्री मंडळाबद्दल देखील लवकरच निर्णय घेण्यात येईल. तसेच या सरकारमध्ये तालिबान प्रमुख हिबतुल्लाह अखुंदजादा (Hibatullah Akhundzada) यांना महत्वाचे स्थान असेल असेही तालिबानी नेता ईनामुल्लाह समनगनीने स्पष्ट केले आहे.

loading image
go to top