तालिबानचा क्रुर चेहरा; आपल्याच सैनिकाला करणार बळीचा बकरा! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Taliban Fighters
तालिबान आपल्याच सैनिकांचा देणार बळी! संरक्षणासाठी घेतला क्रुर निर्णय

तालिबानचा क्रुर चेहरा; आपल्याच सैनिकाला करणार बळीचा बकरा!

अफगाणिस्तानात (Afghanistan) सत्तेवर आल्यापासून तालिबानला (Taliban) त्यांच्या प्रतिस्पर्धी इस्लामिक स्टेटपासून सुरक्षेच्या दृष्टीनं अनेक आव्हानं निर्माण झाली आहेत. या आव्हानांना सामोरं जाण्यासाठी तालिबानने आता काही मोठी पावलं उचलण्यास सुरूवात केली आहे. तालिबानने आता अधिकृतपणे आपल्या सैन्यात 'आत्मघाती बॉम्बर'ची (Suicide Bombers) भरती करण्याचा निर्णय घेतला आहे.

हेही वाचा: बाटलीत चक्क 'ती' हवा भरून महिलेनं कमावले लाखो रुपये; अजब व्यवसाय बेतला जिवावर

ऑगस्ट 2021 मध्ये सत्तेवर येण्यापूर्वी, तालिबानने 20 वर्षांच्या युद्धात अमेरिकन आणि अफगाण सैन्यावर हल्ला करण्यासाठी आणि त्यांचा पराभव करण्यासाठी आत्मघाती बॉम्बर हे प्रमुख शस्त्र वापरलं. आता तालिबानने अफघानिस्तानवर सत्ता मिळवली आहे, मात्र तरीही तालिबान आता पुन्हा त्या सर्व आत्मघाती हल्लेखोरांना पुन्हा आपल्या सैन्यात सामील करणार असल्याचं समजतंय. तालिबानचे उपप्रवक्ते बिलाल करीमी यांनी म्हटलं आहे की, तालिबानला आता अफगाणिस्तानच्या संरक्षणासाठी देशभरात आत्मघातकी हल्लेखोरांची विखुरलेली पथकं एकत्र करून एक विशेष पथक तयार करायचं आहे.

हेही वाचा: कझाकीस्तानमध्ये आंदोलन पेटले

या पथकाचे मुख्य लक्ष्य इस्लामिक स्टेटच्या स्थानिक शाखा असतील. तालिबान सत्तेवर आल्यापासून इस्लामिक स्टेटने किमान पाच मोठे हल्ले केले आहेत. यातील अनेक हल्ले आत्मघातकी हल्लेखोरांनी केले होते. त्यामुळे आता अशा हल्ल्यांना उत्तर देण्यासाठी तालिबानने हा निर्णय घेतला आहे.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :taliban
loading image
go to top