

Afghan women under strict Taliban regulations following the introduction of a controversial domestic violence law in Afghanistan.
esakal
अफगाणिस्तानातील महिलांची वरचेवर परिस्थिती बिकट होत चालली आहे. तालिबानने एक नवीन कायदा लागू केला आहे जो महिलांवरील घरगुती हिंसाचाराला कायदेशीररित्या मान्यता देतो. या कायद्यानुसार, पती आपल्या पत्नी आणि मुलांना जोपर्यंत त्यामुळे हाडे तुटत नाहीत किंवा उघड्या जखमा होत नाहीत तो पर्यंत शारीरिक शिक्षा देऊ शकतो, याचा अर्थ असा की जर हाडे तुटलेली नाहीत तर मारहाण करणे चुकीचे नाही. वृत्तांनुसार, तालिबानचे सर्वोच्च नेते हिबतुल्ला अखुंदजादा यांनी या दंड संहितेवर स्वाक्षरी केली होती. हा कायदा एक नवीन व्यवस्था निर्माण करतो, ज्यामध्ये गुन्हेगार "स्वतंत्र" आहे की "गुलाम" तसेच तो कोणत्या वर्गातील आहे यावर आधारित शिक्षा दिली जाते.