तालिबानचे महिलांसाठी पुन्हा अजब फर्मान, नव्या धार्मिक गाईडलाईन्स जारी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

taliban

तालिबानचे महिलांसाठी पुन्हा अजब फर्मान, नव्या गाईडलाईन्स जारी

sakal_logo
By
टीम-ईसकाळ

तालिबान प्रशासन आता मुली आणि महिलांसाठी कठोर आदेश जारी करत आहे. तालिबान प्रशासनाने यावर आता नवीन "इस्लामिक धार्मिक मार्गदर्शक तत्त्वे" जारी केली. सत्तेत आल्यानंतर तालिबानने महिलांना काम करण्याचे स्वातंत्र्य देण्याची चर्चा केली होती, परंतु आता पुन्हा एकदा ज्या प्रकारे धार्मिक मार्गदर्शक तत्त्वे जारी केली जात आहेत, त्यावरून या संघटनेने आपली जुनी परंपरा कायम ठेवल्याचे दिसते

महिलांचं स्वातंत्र्य हिरावतंय, धार्मिक मार्गदर्शक तत्त्वे जारी

खरं तर, तालिबान प्रशासनाने रविवारी नवीन 'इस्लामिक धार्मिक मार्गदर्शक तत्त्वे' जारी केली आहेत, त्यानुसार महिला अभिनेत्रींना देशातील टेलिव्हिजन वाहिन्यांवरील मालिकांमध्ये किंवा डेली सोपमध्ये दाखवता येणार नाही. इतकेच नाही तर तालिबानने महिला अभिनेत्रींना घेऊन बनवल्या जाणाऱ्या सर्व जुन्या मालिकांचे प्रसारण थांबवण्याचे आदेशही दिले आहेत. महिला टीव्ही पत्रकारांनी अँकरिंग करताना हिजाब परिधान करावा, असेही तालिबानच्या आदेशात नमूद करण्यात आले आहे. ज्यानुसार महिला अभिनेत्रींना देशातील टेलिव्हिजन वाहिन्यांवरील मालिका किंवा डेली सोपमध्ये दाखवता येणार नाही.

हेही वाचा: वॉर हिरो अभिनंदनला 'वीरचक्र', राष्ट्रपतींच्या हस्ते झाला सन्मान

सोशल मीडिया नेटवर्कवर प्रसारित

तालिबान मंत्रालयाने इस्लामिक आणि अफगाण मूल्यांच्या विरोधात असलेल्या चित्रपट किंवा कार्यक्रमांवर बंदी घालण्याची मागणी केली. मंत्रालयाचे प्रवक्ते हकीफ मोहाजिर यांनी एएफपी वृत्तसंस्थेला सांगितले की ही धार्मिक मार्गदर्शक तत्त्वे आहेत, नियम नाहीत .नवीन मार्गदर्शक तत्त्वे रविवारी रात्री उशिरा सोशल मीडिया नेटवर्कवर प्रसारित करण्यात आली. युनिव्हर्सिटीमध्ये महिला काय परिधान करू शकतात आणि काय करू शकत नाहीत याचे नियम तालिबानने आधीच लागू केले आहेत. याशिवाय, अनेक अफगाण पत्रकारांना मारहाण करण्यात आली आणि प्रेसचे स्वातंत्र्य अबाधित ठेवण्याचे आश्वासन देऊनही त्यांचा छळ करण्यात आला.  

loading image
go to top