
डोक्यापासून पायापर्यंत बुरखा घाला, तालिबान प्रमुखाचा फतवा
आफगाणिस्तानमध्ये तालिबान (Taliban)च्या सर्वोच्च नेत्याने महिलांसाठी एक नवा फतवा जारी केला आहे. अफगाणिस्तानचे सर्वोच्च नेते आणि तालिबान प्रमुखांनी शनिवारी देशातील महिलांना सार्वजनिक ठिकाणी सर्व शरीर झाकणारा बुरखा घालण्याचे आदेश दिले आहेत.
कट्टर इस्लामवाद्यांनी देशातील सत्ता काबीज केल्यापासून महिलांवर निर्बंध लादण्यास सुरूवात केली आहे. दरम्यान महिलांच्या जीवनावर आतापर्यंत लादण्यात आलेल्या सर्वात कठोर निर्बंधांपैकी हा एक निर्णय आहे.
"त्यांनी चादोरी (डोक्यापासून पायापर्यंत बुरखा) परिधान केला पाहिजे कारण तो पारंपारिक आणि आदरणीय आहे," काबुलमधील एका कार्यक्रमात तालिबान नेते (हिबतुल्ला अखुंदजादा Hibatullah Akhundzada) यांनी जारी केलेल्या हुकूमात असे म्हटले आहे.
हेही वाचा: श्रीलंकेचे पंतप्रधान महिंदा राजपक्षे राजीनामा देण्याची शक्यता
Web Title: Taliban Supreme Leader Orders Women To Wear All Covering Burqa In Public
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..