esakal | पंजशीरमध्ये लढाई, वयोवृद्धांचा 'माइन क्लियरन्स टुल' म्हणून वापर
sakal

बोलून बातमी शोधा

Panjshir

पंजशीरमध्ये लढाई, वयोवृद्धांचा 'माइन क्लियरन्स टुल' म्हणून वापर

sakal_logo
By
दीनानाथ परब

काबुल: आपल्या मार्गात भूसुरुंग (mine) तर पेरलेले नाहीत ना? याची खातरजमा करुन घेण्यासाठी तालिबान पंजशीरमधल्या (Taliban panjshir) वयोवृद्ध सैनिकांचा 'माइन क्लियरन्स टुल' (mine clearance tool) म्हणून वापर करतेय असा आरोप अफगाणिस्तानचे उपराष्ट्राध्यक्ष अमरुल्लाह सालेह (Amrullah Saleh) यांनी केला आहे. पंजशीरमध्ये सध्या तालिबान आणि विरोधी गटामध्ये जोरदार युद्ध सुरु आहे. दोन्ही बाजूला जीवतहानी झाली आहे. अमरुल्ला सालेह यांनी तालिबान युद्ध गुन्हे करत असल्याचा आरोप केलाय.

अमरुल्लाह सालेह सध्या पंजशीरमध्ये असून ते रेसिस्टन्स फोर्सचे नेतृत्व करत आहेत. तालिबानने पंजशीरला मिळणाऱ्या मानवीय मदतीचे मार्ग रोखून धरले आहेत. तालिबानने पंजशीरमधल्या फोन लाइन्स आणि वीज पुरवठा खंडीत केल्याचा आरोप अमरुल्लाह सालेह यांनी केला. तालिबानकडून मोठ्या प्रमाणावर अत्याचार सुरु आहेत. या कट्टरपंथीय गटाला आंतरराष्ट्रीय मानवी कायद्याबद्दल अजिबात आदर नाहीय. संयुक्त राष्ट्राने त्यांच्याविरोधात कारवाई करावी, असे सालेह यांनी म्हटले आहे.

हेही वाचा: भारताची स्टार टेबल टेनिसपटू मनिका बत्राचा कोचवर गंभीर आरोप

अफगाणिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष अश्रफ घनी १५ ऑगस्टला देश सोडून पळाल्यानंतर अमरुल्लाह सालेह यांनी देशाच्या संविधानानुसार, स्वत:ला काळजीवाहू राष्ट्राध्यक्ष म्हणून घोषित केले. सालेह यांच्या या घोषणेला अद्यापपर्यंत कुठल्याही देशाने मान्यता दिलेली नाही. पंजशीरमध्ये खोऱ्यामध्ये सुरुवातीपासूनच घनघोर लढाईची शक्यता वर्तवली जात होती आणि आता तेच सुरु आहे. कारण नैसर्गिक संरक्षण लाभलेल्या पंजशीरमध्ये तालिबानला कधीही विजय मिळवता आलेला नाही. पंजशीरचे दिवंगत नेते अहमद शाह मसूद यांचा मुलगा अहमद मसूदच्या नेतृत्वाखाली तालिबान विरोधात लढाई सुरु आहे. अफगाणिस्तानातील तालिबान विरोधी योद्धे इथे एकवटले आहेत.

loading image
go to top