esakal | शरण या किंवा मरा; तालिबानची धमकी देणारी पत्रे दारांवर
sakal

बोलून बातमी शोधा

Taliban

शरण या किंवा मरा; तालिबानची धमकी देणारी पत्रे दारांवर

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

काबूल - अमेरिका (America) आणि नाटो देशांनी अफगाणिस्तानमधील (Afghanistan) दोन दशकांची मोहीम (Campaign) अखेर आटोपती घेतल्यानंतर तालिबानने (Taliban) देशावरील पकड भक्कम करण्यासाठी अनेक उपाय योजले आहेत. अमेरिकी सैन्याला (Army) मदत केलेल्या नागरिकांच्या (Citizens) दारांवर, शरण या किंवा मरा, अशा धमक्या देणारी पत्रे चिकटवली जात आहेत.

अनेक शहरांत हा प्रकार घडत असल्याचे वृत्त आहे. अमेरिकेच्या नेतृत्वाखाली अनेक देशांनी नागरिकांना बाहेर काढण्याची मोहीम राबविली. आपल्या देशाशिवाय मदत केलेल्या आणि गरज असलेल्या अधिकाधिक अफगाण नागरिकांच्या सुटकेसाठी प्रयत्न करण्यात आले. यानंतरही ज्यांना अफगाणिस्तानात थांबणे भाग पडले त्यांच्यावर भयंकर स्थिती ओढवेल हे स्पष्ट झाले. यातील अनेक स्थानिक नागरिक देश सोडण्याच्या प्रयत्नात होते. असंख्य नागरिक विमानतळावर गेले सुद्धा होते, पण त्यांना विमानात जागा मिळू शकली नाही. आता आपण अडकलो असून जिवाची भीती वाटत असल्याचे अनेकांनी सांगितले.

हेही वाचा: VIDEO: तालिबानच्या क्रौर्याचे दर्शन; हेलिकॉप्टरला लटकावला मृतदेह

तालिबान्यांनी घरोघरी झडती घेण्याचे सत्र याआधीच सुरु केले होते. आता घराच्या दारावर पत्र चिकटविली जात आहेत. तालिबानने आमंत्रित केलेल्या न्यायालयासमोर हजर व्हावे, तेथे तुमच्या शिक्षेचे स्वरूप जाहीर केले जाईल. तेथे हजर राहिला नाहीत तर त्याची परिणती मृत्युदंडात होईल, अशी धमकी देणारा संदेश या पत्रांत आहे.

याआधी सत्ता बळकावली तेव्हा तालिबानने असे दडपशाहीचे धोरण अवलंबिले होते. तेव्हा ते मर्यादेत झाले होते, पण आता शहरा-शहरांत ते राबविले जात आहे.

अमेरिकी सैन्याच्या मित्रांना धमक्या

  • हेल्मांड प्रांतात ब्रिटिश सैन्याला रस्तेबांधणीच्या कामात मदत केलेल्या बांधकाम कंपनीच्या प्रमुखाला लपून राहणे भाग. त्याच्या दारावर लावण्यात आलेल्या पत्रावर तालिबानचा शिक्का

  • अमेरिकी सैन्यासाठी दुभाषाचे काम केलेली व्यक्ती मशिदीत प्रार्थना करून परतली तेव्हा त्याला पादत्राणांमध्ये धमकी देणारे पत्र सापडले

  • ब्रिटिश सैन्यासाठी दुभाषी म्हणून काम केलेल्या व्यक्तीच्या पत्रात धर्मविरोधकांचा गुप्तहेर असा उल्लेख

loading image
go to top