भारताचं राष्ट्रगीत टांझानियाच्या भावंडांनी गायलं; Video Viral

भारताचा ७३ वा प्रजासत्ताक दिनानिमित्त टांझानियाची भावंडांची भारतीयांना खास भेट
भारताचा ७३ वा प्रजासत्ताक दिन साजरा करण्यासाठी टांझानियाची भावंडं किली पॉल आणि नीमा यांनी राष्ट्रगीत गायले.
भारताचा ७३ वा प्रजासत्ताक दिन साजरा करण्यासाठी टांझानियाची भावंडं किली पॉल आणि नीमा यांनी राष्ट्रगीत गायले.
Summary

भारताच्या 73 व्या प्रजासत्ताक दिनी, किली पॉलने स्वतःचा आणि त्याच्या बहिणीचा भारताचे राष्ट्रगीत गातानाचा व्हिडिओ पोस्ट केला. व्हिडिओला आतापर्यंत 3 लाख व्ह्यूज मिळाले आहेत.

अफ्रिकेतील टांझानिया येथील इंटरनेट सेन्सेशन असलेले भावंडं किली पॉल आणि त्यांची बहीण नीमा यांचा पुन्हा एक नवा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. टांझानियनची ही भावंड बॉलीवूडची गाणी गाऊन सोशल मिडियावर प्रसिद्ध झाली. त्यांचे व्हिडिओ भारतीयांसह सर्वांनाच खूप आवडतात. आज भारत ७३ वा प्रजासत्ताक दिन साजरा करत आहे त्यानिमित्त किली आणि निमाने भारतातील सर्व चाहत्यांसाठी आणि फॉलोअर्ससाठी खास भेट दिली आहे.

किली पॉलने स्वत:चा आणि त्याच्या बहिणीचा भारताचे राष्ट्रगीत 'जन गण मन' गातानाचा व्हिडिओ शेअर करुन सर्व भारतीयांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. किलीने भारतातील त्याच्या सर्व चाहत्यांना दिलेली ही कदाचित सर्वोत्तम भेट होती.

भारताच्या 73 व्या प्रजासत्ताक दिनी, किली पॉलने स्वतःचा आणि त्याच्या बहिणीचा भारताचे राष्ट्रगीत गातानाचा व्हिडिओ पोस्ट केला. त्यांनी सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छाही दिल्या. “भारताच्या प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा'' असे कॅप्शन देऊन त्यांनी व्हिडिओ शेअर केला आहे.

भारतीयांना हा व्हिडिओ प्रंचड आवडला आहे. आता पर्यंत या व्हिडिओला ३ लाखांपेक्षा जास्त व्हूयज मिळाले आहे.

किली आणि नीमा पॉल यांचा एक व्हिडिओ इंस्टाग्रामवर व्हायरल झाल्यानंतर रातोरात इंटरनेट सेन्सेशन बनले. किली आणि नीमा ही टांझानियामधील भाऊ-बहीण जोडी आहेत ज्यांनी त्यांच्या ऑन-पॉइंट लिप-सिंक व्हिडिओ आणि ग्रूवी कोरिओग्राफीने नेटिझन्सची मने जिंकली आहेत. इंस्टाग्रामवर किलीचे 1.4 दशलक्ष फॉलोअर्स आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com