भ्रष्टाचारामुळे दरवर्षी अब्जावधींचे नुकसान

वृत्तसंस्था
Saturday, 26 September 2020

 करचुकवेगिरी, भ्रष्टाचार आणि आर्थिक गैरव्यवहारांमुळे सर्वच देशांचे ५०० अब्ज डॉलरचे नुकसान होत असून हा पैसा जगातील गरीबांसाठी वापरता आला तर त्यांचे कल्याण होईल, असे संयुक्त राष्ट्रांच्या उच्चस्तरीय समितीने एका अहवालात म्हटले आहे. 

न्यूयॉर्क - करचुकवेगिरी, भ्रष्टाचार आणि आर्थिक गैरव्यवहारांमुळे सर्वच देशांचे ५०० अब्ज डॉलरचे नुकसान होत असून हा पैसा जगातील गरीबांसाठी वापरता आला तर त्यांचे कल्याण होईल, असे संयुक्त राष्ट्रांच्या उच्चस्तरीय समितीने एका अहवालात म्हटले आहे. 

कोणत्याही देश हे मान्य करणार नाही, पण नफ्यातील  उद्योगांकडून कर भरण्यात होणाऱ्या टाळाटाळीमुळे नुकसान होतेे.  अनेक देश कालबाह्य यंत्रणाच राबवितात.  गरीबी, पर्यावरण बदल आणि कोरोनासारख्या संकटांचा सामना करण्यासाठी वित्तसंस्था आणि यंत्रणेवर विश्‍वास  ठेवावा लागतो. मात्र, याबाबतील भ्रमनिरास होत आहे,’ असे समितीच्या सहअध्यक्षा डेलिया ग्रिबाऊस्काइट यांनी अहवालात म्हटले आहे.

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

समितीचे दावे
७ हजार अब्ज डॉलर - कर सवलती असणाऱ्या देशांमध्ये दडवलेली खासगी संपत्ती
१० टक्के  -  एकूण जागतिक उत्पन्नाच्या तुलनेत कररचनेत नसलेली संपत्ती
१.६ हजार अब्ज डॉलर  - दर वर्षी होणारा आर्थिक गैरव्यवहार

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Tax evasion corruption financial malpractice cost all countries