शिक्षिकेने विद्यार्थ्यासोबत ठेवले संबंध, नंतर केले लग्न; अशी झाली सुटका

विद्यार्थ्यासोबत शारीरिक संबंध प्रस्थापित केल्यामुळे शिक्षिकेला शिकवण्याचा परवाना सरेंडर करावा लागला
Crime
Crimesakal

एका शिक्षिकेने विद्यार्थ्यासोबत तिच्याच घरात संबंध (Teacher physical relationship with student) ठेवले. यानंतर तिला अटक करण्यात आली. दोन वर्षांपासून न्यायालयात प्रकरणाची सुनावनी सुरू होती. यानंतर दोघांनी लग्न करायचे ठरवले आणि प्रकरण शांत झाले. ही घटना अमेरिकेच्या (america) मिसूरी येथे घडली.

डेली मेलच्या वृत्तानुसार, महिला शिक्षिकेला सुमारे दोन वर्षांपूर्वी अटक करण्यात आली होती. शिक्षिकेवर आपल्याच वर्गातील एका विद्यार्थ्यासोबत आपल्याच घरात शारीरिक संबंध प्रस्थापित केले. ही बाब उघडकीस आल्यानंतर विद्यार्थ्याच्या कुटुंबीयांनी शिक्षिकेवर गुन्हा दाखल केला होता. यानंतर शिक्षिकेला अटक करून गुन्हा दाखल (Teacher physical relationship with student) करण्यात आला. आश्‍चर्यकारक बाब म्हणजे महिला शिक्षिकेने आपला गुन्हा कबूल करीत संपूर्ण घटना सांगितली.

Crime
मध्यरात्री गेला प्रेयसीला भेटायला; दाट धुक्यामुळे विहिरीत पडला अन्...

विद्यार्थ्यासोबत शारीरिक संबंध (Physical abuse) प्रस्थापित केल्यामुळे शिक्षिकेला शिकवण्याचा परवाना सरेंडर करावा लागला. गुन्हा दाखल झाल्यानंतर न्यायालयात प्रकरणावर सुनावणी सुरू होती. दोन्ही पक्षांना सतत कोर्टात हजर राहावे लागत होते. दरम्यान, दोघांनी ठरवले की लग्न केले तर यातून सुटका मिळेल आणि हाच सर्वोत्तम उपाय ठरेल.

यानंतर दोघांनी संमतीने लग्न केले. हा विवाह केव्हा झाला याचा उल्लेख अहवालात नसला तरी, फिर्यादींनी पती-पत्नीचे विशेषाधिकार लक्षात घेऊन महिला शिक्षिकेवरील सर्व आरोप फेटाळल्यानंतर ही बाब उघडकीस आली. सध्या या अहवालात दोघांच्या वयाची कोणतीही माहिती नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com