टेक कंपनीकडून कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट! दिला 1 कोटीहून जास्तीचा बोनस

tech company offering over 1 crore rupees bonuses to select employees latest news
tech company offering over 1 crore rupees bonuses to select employees latest news

जगातील सर्वात मोठ्या टेक कंपन्यांपैकी एक असलेली कंपनी अॅप्पल इंक (Apple Inc.) ने त्यांच्या कर्मचाऱ्यांना तब्बल एक कोटींचा बोनस ऑफर करत आहे, कंपनीने त्यांच्या कर्मचाऱ्यांना दुसऱ्या कंपनीत जाण्यापासून रोखण्यासाठी ही अनोखी पद्धत अवलंबली आहे. नुकतेच कंपनीने त्यांच्या काही निवडक अभियंत्यांना (Engineers) तब्बल 1 कोटी रुपयांपेक्षा जास्त स्टॉक बोनस दिला आहे. (Tech Company Offering Over 1 Crore In Bonuses)

ब्लूमबर्गच्या रिपोर्टनुसार, आयफोन निर्माता कंपनी सिलिकॉन डिझाईन, हार्डवेअर, सॉफ्टवेअर आणि ऑपरेशन्स ग्रुपमधील काही अभियंत्यांना गेल्या आठवड्यात हा बोनस ऑफर केला. कंपनी त्यांना $50,000 ते $180,000 (1.35 कोटी रुपये) बोनस देत आहे. तज्ञांच्या मते, बहुतेक अभियंत्यांना शेअर्सच्या रूपात $80,000, $100,000 किंवा $120,000 चा बोनस देण्यात आला आहे.

Apple आणि फेसबुक यांच्यात स्पर्धा

Facebook Inc. आणि Apple Inc. या दिग्गज कंपन्यांमध्ये मोठ्या प्रमाणात चढाओढ सुरु आहे. दरम्यान Apple कंपनीच्या प्रतिनिधींनी याबद्दल कुठलीही माहिती देणे टाळले आहे. सिलिकॉन व्हॅलीमधील बड्या टेक कंपन्या, विशेषत: ऍपल आणि मेटा, चांगले कर्मचारी मिळवण्यासाठी स्पर्धा करत आहेत. गेल्या काही महिन्यांत, जवळपास 100 अॅपल अभियंते मार्क झुकरबर्गच्या कंपनीत रुजू झाले आहेत. मात्र अनेक मेटा (Meta) कर्मचारी नुकतेच Apple मध्ये सामील झाले आहेत. पुढील दोन वर्षांत दोन्ही कंपन्यांनी मोठ्या लॉन्चची योजना आखली आहे. विशेषत: ऑगमेंटेड आणि व्हर्च्युअल-रिअॅलिटी हेडसेट आणि स्मार्टवॉचमध्ये, दोघांमध्ये जोरदार स्पर्धा होऊ शकते.

tech company offering over 1 crore rupees bonuses to select employees latest news
Xiaomi 12 सीरीजचे तीन नवे स्मार्टफोन लॉन्च, काय आहेत फीचर्स? वाचा

दरम्यान हा बोनस Apple च्या सामान्य पॅकेजचा भाग नाहीये. कंपनी कधीकधी आपल्या कर्मचाऱ्यांना अतिरिक्त कॅश बोनस देते. मात्र यावेळी कंपनीने दिलेल्या स्टॉक बोनसने अनेकांना आश्चर्याचा धक्का दिला आहे. खुद्द बोनस मिळालेल्या अभियंत्यांनाही याची अपेक्षा नव्हती. एप्लिकेबल डिव्हीजनमध्ये 10 ते 20 टक्के अभियंत्यांना हा बोनस देण्यात आला आहे.

tech company offering over 1 crore rupees bonuses to select employees latest news
Upcoming Cars 2022 : नव्या वर्षात लॉंच होणार 'या' दमदार SUV

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com