esakal | 'जगभरातील देशांनी पंतप्रधान मोदींना फॉलो करावं'; WHO प्रमुखांची स्तुतीसुमने

बोलून बातमी शोधा

narendra modi

जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) प्रमुख टेड्रोस अधानोम घेब्रेरियेसेस यांनी भारताचे तोंडभरुन कौतुक केलंय. 

'जगभरातील देशांनी पंतप्रधान मोदींना फॉलो करावं'; WHO प्रमुखांची स्तुतीसुमने
sakal_logo
By
सकाळन्यूजनेटवर्क

नवी दिल्ली- भारतात कोरोना महामारीवर मात करण्यासाठी लसीकरण मोहीम 16 जानेवारीपासून सुरु झाली आहे. आतापर्यंत देशात 1 कोटी 26 लाख 71 हजार लोकांना कोरोनाची लस देण्यात आली आहे. याशिवाय भारताने आपल्या शेजारी राष्ट्रांनाही कोरोनाची लस देण्यास सुरुवात केली आहे. अनेक देशांना भारताने मोफतमध्ये कोरोनाची लस दिलीये. याच पार्श्वभूमीवर जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) प्रमुख टेड्रोस अधानोम घेब्रेरियेसेस यांनी भारताचे तोंडभरुन कौतुक केलंय. 

वेतन आणि पेन्शन मिळणं सरकारी कर्मचाऱ्याचा अधिकार- सर्वोच्च न्यायालय

टेड्रोस अधानोम घेब्रेरियेसेस यांनी आपल्या ट्विटमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना टॅग करत त्यांची स्तुती केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी  #VaccinEquity चे समर्थन केल्याबद्दल आभार मानले आहेत. यासोबतच ते म्हणालेत की, #COVAX आणि #COVID19 लशीचे डोस दुसऱ्या देशांसोबत शेअर केल्यामुळे, त्यांना कोरोना महामारीविरोधात लढण्यासाठी मोठी मदत मिळाली आहे. 

दुसऱ्या देशांना कोरोना लस देण्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रतिबद्धतेमुळेच आज 60 पेक्षा अधिक देशांतील आरोग्य कर्मचारी आणि इतर प्राथमिक समुहातील लोकांना लस मिळणे शक्य झाले आहे. त्यामुळे त्या देशातही लसीकरण मोहीम सुरु झाली आहे. मला आशा आहे की, इतर देशही तुमच्या कृतीचे अनुकरण करतील, असं WHO चे प्रमुख टेड्रोस अधानोम घेब्रेरियेसेस म्हणाले आहे. भारताने इतर देशांना मदत करण्यासाठी उचललेल्या पाऊलाबद्गल घेब्रेरियेसेस यांनी कौतुक केलंय.

फोनमध्ये स्टोरेज स्पेस फुल झाल्यास टेन्शन घेऊ नका; अशी मोकळी करा जागा 

दरम्यान, देशात आतापर्यंत 11 कोटींपेक्षा अधिक लोकांना कोरोनाची बाधा झाली आहे. दुसरीकडे जगभरात 25 लाख लोकांचा या विषाणूमुळे मृत्यू झाला आहे. कोरोना महामारीने अमेरिकेला सर्वाधिक पिडले आहे. देशात आतापर्यंत 5 लाखांपेक्षा अधिक मृत्यूची नोंद झाली आहे. सध्या जगात 2 कोटींपेक्षा अधिक रुग्णांवर उपचार सुरु आहे. 8 कोटीपेक्षा अधिक लोकांनी कोरोनावर मात केली असून ते ठीक झाले आहे. असे असले तरी कोरोनाचा धोका पूर्णपणे टळलेला नाही.