Joe Biden: 'बायडेन यांना उडवायचं म्हणून..' भारतीय वंशाच्या व्यक्तीने व्हाईट हाऊसवर चढवली कार, असं केलं प्लॅनिंग

थेट व्हाईट हाऊसच्या सेक्युरिटी बॅरिअर्सवर चढवला ट्रक
Joe Biden: 'बायडेन यांना उडवायचं म्हणून..' भारतीय वंशाच्या व्यक्तीने व्हाईट हाऊसवर चढवली कार, असं केलं प्लॅनिंग

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांना भारतीय वंशाच्या अमेरिकी युवकानं जीवे मारण्याची धमकी दिली आहे. या १९ वर्षीय युवकानं त्यासाठी थेट एक ट्रकच व्हाईट हाऊसच्या सेक्युरिटी बॅरिअर्सवर चढवला. या युवकाला व्हाईट हाऊस पोलिसांनी अटक केली असून त्याच्या ट्रकमधून नाझी ध्वज हस्तगत करण्यात आला आहे.(Teen Arrested For Trying To Kill Joe Biden Had Nazi Flag In Crashed Truck)

साई वर्षित कंदुला असं या १९ वर्षीय युवकाचं नाव आहे. तो सेंट लुईसमधल्या चेस्टरफिल्ड या उपनगराचा रहिवासी आहे. त्यानं सोमवारी रात्री १० च्या सुमारास एक ट्रकच व्हाईट हाऊसच्या सेक्युरिटी बॅरिकेट्सवर चढवला. (Latest Marathi News)

अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, तरुणाने चौकशीदरम्यान सांगितले की, त्याला राष्ट्रपती भवनात जाऊन सत्ता हस्तगत करून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांची हत्या करायची होती.

Joe Biden: 'बायडेन यांना उडवायचं म्हणून..' भारतीय वंशाच्या व्यक्तीने व्हाईट हाऊसवर चढवली कार, असं केलं प्लॅनिंग
Real life Norway vs Mrs Chatterjee : मुलीच्या ताब्यासाठी जर्मन सरकारविरुद्ध लढा; CM शिंदेकडे मागितली दाद

सहा महिन्यांपासून तरुण हल्ल्याची योजना आखत होता, असे कागदपत्रात नमूद करण्यात आले आहे. त्याची संपूर्ण माहिती ग्रीन बुकमध्ये आहे. आरोपीचा हेतू व्हाईट हाऊसमध्ये प्रवेश करून सत्ता बळकावणे आणि देशाचे प्रभारी बनणे हा होता. तसेच त्याच्यावर मालमत्ता चोरीचा आरोपदेखील करण्यात आला होता.

Joe Biden: 'बायडेन यांना उडवायचं म्हणून..' भारतीय वंशाच्या व्यक्तीने व्हाईट हाऊसवर चढवली कार, असं केलं प्लॅनिंग
PM मोदींनी क्रिकेट विश्वचषकासाठी ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधानांना दिलं निमंत्रण; पार पडली द्विपक्षीय बैठक

चौकशीदरम्यान, सत्ता कशाप्रकारे हस्तांतरीत केली असतीस? असा सवाल उपस्थित केला. त्यावेळी, जो कोणी माझ्या वाटेत येईल त्याची मी हत्या करणार, मग ती व्यक्ती राष्ट्रपती असली तरी. असे उत्तर तरुणाने दिले. दस्तऐवजात फौजदारी तक्रारीचा समावेश आहे. यामध्ये कंदुलावर अमेरिकेतील $1,000 पेक्षा जास्त संपत्ती लुटल्याचा आरोप आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com