Israel Terrorist AttackESakal
ग्लोबल
Israel Attack: दहशतवादी हल्ल्यानं इस्रायल पुन्हा हादरलं! तीन बसमध्ये स्फोट, नेतान्याहू यांनी बैठक बोलवली
Israel Terrorist Attack: मध्य इस्रायलमध्ये सार्वजनिक बसेसमध्ये झालेल्या स्फोटांच्या मालिकेनंतर इस्रायली पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू सुरक्षा बैठक घेणार आहेत.
इस्रायल आणि हमासमधील युद्धबंदी आता उद्ध्वस्त होणार आहे. शांतता प्रयत्नांच्या दरम्यान, पुन्हा स्फोट झाले आहेत. इस्रायल पुन्हा एकदा दहशतवादी हल्ल्यांनी हादरले आहे. अनेक बसेसमध्ये झालेल्या स्फोटांच्या मालिकेने इस्रायल हादरले आहे. गुरुवारी संध्याकाळी इस्रायलची राजधानी तेल अवीवजवळ तीन रिकाम्या बसेसमध्ये स्फोट झाल्याचे वृत्त आहे. इस्रायल याला दहशतवादी हल्ला म्हणत आहे.