esakal | दहशतवादी हल्ल्यामुळे काश्मिरी पंडित आणि शिख भयभीत झाले आहेत | Global
sakal

बोलून बातमी शोधा

global

काश्‍मीरातील हल्ल्यांचा अमेरिकेतही निषेध

sakal_logo
By
तेजस भागवत

ह्यूस्टन : जम्मू आणि काश्‍मीरमधील पंडित आणि शिखांवर वाढत्या हल्ल्याबद्दल अमेरिकेतील भारतीय संघटना इंडो अमेरिकन काश्मिरी फोरम (आयएकेएफ)ने संताप आणि दु:ख व्यक्त केले आहे.

दहशतवादी हल्ल्यामुळे काश्मिरी पंडित आणि शिख भयभीत झाले असून त्यांच्या मदतीसाठी नवी दिल्लीतील अमेरिकी दूतावासात विशेष विभाग सुरू करावा, असे आवाहनही या संघटनेने अमेरिकी सरकारला केले आहे. हल्ल्यांमुळे निर्वासिताचे जीवन जगणाऱ्या काश्मिरी पंडित, हिंदू, शिख आणि ख्रिश्‍चन नागरिकांची या विशेष विभागाद्वारे मदत करता येईल, असे संघटनेने नमूद केले आहे. आयएकेएफचे आंतरराष्ट्रीय समन्वयक डॉ. विजय सजावल म्हणाले की, दहशतवादी थंड डोक्यांनी हत्याकांड घडवून आणत असून कालच्या हल्ल्याने १९९० च्या दशकांतील क्लेषदायक घटनांची आठवण झाली.

loading image
go to top