पाकिस्तानच्या यादीतून दहशवाद्यांची नावे गुपचूप वगळली

वृत्तसंस्था
Tuesday, 21 April 2020

पाकने २००८ मधील मुंबई हल्याचा सूत्रधार आणि लष्करे तैय्यबाचा म्होरक्या झाकी-उर-रेहमान लख्वी याचेही नाव यातून गायब झाले आहे.   

न्यूयॉर्क : आर्थिक गैरव्यवहाराच्या विरोधात जागतिक पातळीवर सक्रीय असलेली दक्षता संस्था (वॉचडॉग) आढावा घेणार असल्यामुळे पाकिस्तानने आपल्या निरीक्षणाखालील यादीतून (वॉचलिस्ट) सुमारे अठराशे दहशतवाद्यांची नावे गुपचुप वगळली आहेत. अमेरिकेतील स्टार्टअप संस्थेच्या पाहणीत पाकची ही चाल उघड झाली आहे. 

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

पाकने २००८ मधील मुंबई हल्याचा सूत्रधार आणि लष्करे तैय्यबाचा म्होरक्या झाकी-उर-रेहमान लख्वी याचेही नाव यातून गायब झाले आहे. पॅरीसस्थित आर्थिक कार्यवाही कृती दल (एफएटीएफ) या दक्षता संस्थेतर्फे आढाव्याची नवी फेरी येत्या जूनमध्ये होणार आहे. पाकिस्तानच्या राष्ट्रीय दहशतवादविरोधी प्राधिकरणातर्फे कथित बहिष्कृत व्यक्तींची यादी बनविली जाते. संशयित दहशदवाद्यांचे आर्थिक व्यवहार रोखणे किंवा त्यांच्याबरोबरील व्यवहार टाळणे संस्थांना शक्य व्हावे हा यामागील हेतू असतो. कॅस्टेलीयम डॉट इन या न्यूयॉर्कस्थित तंत्रज्ञान नियामक संस्थेला मात्र पाकने या यादीत फेरफार केल्याचे दिसून आले. २०१८ मध्ये सुमारे सात हजार सहाशे नावे असलेली यादी गेल्या १८ महिन्यांत तीन हजार आठशेपर्यंत कमी झाली आहे. मार्चच्या सुरवातीपासून अठराशे नावे वगळण्यात आली. 

#Lockdown2.0 : लॉकडाउनमुळे बऱ्याच देशात संसार मोडण्याच्या मार्गावर

पाक एफएटीएफच्या साथीत एका कृती योजनेच्या अंमलबजावणीसाठी प्रयत्नशील आहे. प्रस्तावित आर्थिक निर्बंधांची परिणामकारक अंमलबजावणी याचा एक भाग आहे. ही नावे वगळण्यामागे हाच उद्देश असू शकतो. 

दहशतवाद्यांना आर्थिक मदतीच्या विरोधातील प्रतिबंधात्मक उपाययोजना आणि आर्थिक निर्बंधांबाबत परिणामकारक कार्यवाहीबाबत पाकला एफएटीएफकडून फार कमी मानांकन मिळाले होते. फेब्रुवारीत मात्र २७ पैकी १४ विषयांवर कार्यवाही झाल्याचे नमूद करण्यात आले. उर्वरीत विषयांवरील प्रगती वेगवेगळ्या पातळीवर असल्याचेही सांगण्यात आले. 

शिक्का बसू नये म्हणून... 
आर्थिक गैरव्यवहार आणि दहशतवाद्यांना आर्थिक मदत या विरोधात उपाययोजनांचे पालन करत नाहीत अशा देशांच्या यादीत आपला समावेश होऊ नये म्हणून पाकिस्तान गेल्या काही महिन्यांपासून धडपड करीत आहे. आधीच अत्यंत नाजूक असलेल्या अर्थव्यवस्थेला आणखी मोठा फटका बसू नये यासाठी हा आटापीटा सरु आहे. सध्या याबाबत निराशाजनक कामगिरी असलेल्या देशांच्या यादीत पाकचा समावेश आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: terrorist names missing from pakistan list USA