
अफगानिस्तानातील पूर्व भागामध्ये बंदूकधाऱ्यांच्या एका समूहाने कमीतकमी सात अफगानी कामगारांची गोळी मारुन हत्या केल्याची घटना घडली आहे.
काबुल : अफगाणिस्तानातील पूर्व भागामध्ये बंदूकधाऱ्यांच्या एका समूहाने कमीतकमी सात अफगाणी कामगारांची गोळी मारुन हत्या केल्याची घटना घडली आहे. याशिवाय केलेल्या बॉम्बस्फोटात एका महिला डॉक्टरचा देखील मृत्यू झाला आहे. या डॉक्टरच्या वाहनामध्ये बॉम्ब लावण्यात आला होता.
हेही वाचा - पाकिस्तान सरकारवर अस्थिरतेचे ढग; इम्रान खान यांच्याविरोधात उद्या अविश्वास ठराव
नंगरहारमध्ये प्लास्टिक कारखान्यात नरसंहार
नंगरहार प्रांताच्या पोलिस प्रमुख जनरल जुमा गुल हेमट यांनी म्हटलं की, सोर्ख रॉड जिल्ह्यातील प्लास्टर कारखान्यातील कामगार या गोळीबारामध्ये मृत्युमूखी पडले आहेत.पोलिसांनी या घटनेसंदर्भात चार संशयित आरोपींना अटक केली आहे. पोलिसांचे प्रवक्ते फरीद खान यांनी दिलेल्या माहितीनुसार, सर्व कामगार अफगाणिस्तानातील अल्पसंख्याक शिया हजारा समुदायाचे होते. काही लोक काबुलची राजधानी तसेच मध्य बामियान आणि उत्तर बल्ख प्रांतातून कारखान्यामध्ये काम करण्यासाठी आले होते.
हेही वाचा - Corona : अँजेला मर्केल यांच्या मॅरेथॉन बैठका; जर्मनीत 28 तारखेपर्यंत वाढवला लॉकडाउन
इस्लामिक स्टेटने घेतली जबाबदारी
इस्लामिक स्टेट समूहाने एक वक्तव्य जाहीर करत या बॉम्ब स्फोटाची जबाबदारी घेतली आहे. त्यांनी म्हटलंय की त्यांच्या दहशतवाद्यांनी एका महिलेच्या वाहनामध्ये बॉम्बचा स्फोट केला. या वक्तव्यात असा दावा केलाय की या महिलेने पूर्व भागातील नंगरहार प्रांताची राजधानी जलालाबादमध्ये अफगान गुप्तचर सेवेसाठी काम केलं होतं.